Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जिथे मुलींचा आवाज ऐकला जातो, तिथूनच खऱ्या बदलाची सुरुवात होते…”

najarkaid by najarkaid
August 20, 2025
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

ADVERTISEMENT

Spread the love

मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

“जिथे मुलींचा आवाज ऐकला जातो, तिथूनच खऱ्या बदलाची सुरुवात होते…”

▪ उपक्रमाचा उगम

            ग्रामीण भागातील मुलींच्या समस्या अनेकदा घरात, समाजात किंवा ग्रामपंचायतीच्या सभेत हरवून जातात. त्यांच्या अडचणी कोणी मांडतच नाहीत; आणि मांडल्या तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर “बालिका स्नेही पंचायत” ही संकल्पना जन्माला आली.

 जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत
जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

नांदेड जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना श्रीमती मिनल करनवाल यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. त्यांनी पाहिले की मुलींना शाळा, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता अशा अनेक मूलभूत बाबींमध्ये अडचणी आहेत; पण त्या मांडण्यासाठी कुठेही योग्य व्यासपीठ नाही. म्हणूनच ग्रामपंचायतीच्या अधिकृत सभेत मुलींनाही बोलण्याची संधी मिळावी, त्यांचे प्रश्न थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचावेत, यासाठी या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ झाला.

▪ जळगाव जिल्ह्यातील सुरुवात

जळगाव जिल्ह्यात “बालिका स्नेही पंचायत” या उपक्रमाला नवी गती मिळाली. कानळदा गावात झालेल्या पहिल्या बालिका स्नेही ग्रामसभेत मुलींनी निर्भीडपणे आपले प्रश्न मांडले.  त्यांनी सांगितले — शाळेत पाणी व स्वच्छतागृह नाही, खेळण्यासाठी जागा नाही, गावात कचरा साचतो, काही अनधिकृत व्यवसायांमुळे मुलींच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो, महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक प्रसाधनगृह नाही, आणि अजूनही बालविवाहाचा धोका कायम आहे.

 जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत
जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

ग्रामपंचायतीने याची दखल घेत तातडीने उपाययोजना सुरू केली. शाळेतील सुविधा सुधारल्या, स्वच्छता उपक्रम राबवले, महिलांसाठी प्रसाधनगृहे उभारली. परिणामी गावात सकारात्मक बदल दिसू लागला आणि इतर गावांनीही या उपक्रमाशी जोडले जाण्याचा निर्णय घेतला.

▪ मुलींचा आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण

“बालिका स्नेही पंचायत” ही केवळ समस्यांचे निराकरण करणारी योजना नाही, तर मुलींच्या आत्मविश्वासाला नवे पंख देणारी शाळा आहे. या व्यासपीठामुळे मुली स्वतःचा आवाज बुलंद करू लागल्या, आपले अधिकार ओळखू लागल्या, नेतृत्वगुण विकसित करून निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ लागल्या.

आतापर्यंत ग्रामसभेत केवळ पुरुष आणि लोकप्रतिनिधींचा आवाज घुमायचा; पण आता या पंचायतांमध्ये मुलींचाही ठसा उमटू लागला आहे.

▪ बदलाची बीजं

“बालिका स्नेही पंचायत” म्हणजे ग्रामीण समाजात नवा संवाद सुरू होण्याचा क्षण. मुली थेट प्रश्न मांडतात, त्यामुळे ग्रामपंचायतीवर तातडीने कृती करण्याची जबाबदारी येते. हा संवाद फक्त समस्या सांगण्यापुरता मर्यादित राहत नाही, तर मुलींमध्ये आवाज उठवण्याची संस्कृती रुजवतो. या प्रक्रियेतून मुलींच्या मनात बदल, उद्याच्या समाजात परिवर्तन आणि पुढील पिढ्यांमध्ये आत्मनिर्भरतेची बीजं रोवली जात आहेत.

▪ भविष्याचा मार्ग

या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ग्रामीण भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. आजची छोटी मुलगी उद्या जबाबदार नागरिक, सक्षम स्त्री आणि कदाचित गावाच्या नेतृत्वात सक्रिय भूमिका बजावणारी व्यक्ती होईल. या उपक्रमाने दाखवून दिले आहे की सामाजिक बदलाची सुरुवात एका संवेदनशील संकल्पनेतूनही होऊ शकते.

▪ एका दूरदृष्टीची कहाणी

श्रीमती मिनल करनवाल यांच्या दूरदृष्टीतून रुजलेली ही संकल्पना आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रेरणादायी ठरत आहे. जळगाव जिल्ह्यातील यश पाहता हा उपक्रम इतरत्रही वेगाने पसरतो आहे. हा प्रवास केवळ पंचायत पातळीवरच्या कामांचा नाही, तर ग्रामीण समाजरचनेत मुलींच्या अधिकारांना स्थान देणाऱ्या एका नव्या सामाजिक क्रांतीचा प्रवास आहे. म्हणूनच, “बालिका स्नेही पंचायत” ही केवळ एक योजना नाही, तर मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारा, त्यांचा आवाज बुलंद करणारा आणि उद्याच्या भारताला नवी दिशा देणारा सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ ठरत आहे.

– युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

Spread the love
Tags: #grampanchayat#GulabraoPatil#jalgaongramin#JalgaonNews#Mahayuti#shivsena
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

Next Post

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

ताज्या बातम्या

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us