IPL 2026: 28 मार्चपासून क्रिकेटचा महासंग्राम! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा कोणाचा सामना कधी?
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार नुकताच संपला असून त्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत विश्वचषक जिंकला. तब्बल एक महिना चाललेल्या या स्पर्धेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान 20 संघांमध्ये 50 पेक्षा अधिक सामने झाले आणि क्रिकेटप्रेमींना रोमांचक सामने पाहायला मिळाले.
या वर्ल्ड कपनंतर आता जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी-20 लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 19 व्या हंगामाची चाहूल लागली आहे. क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. जरी संपूर्ण स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नसले तरी पहिल्या फेरीतील 28 मार्च ते 12 एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचे वेळापत्रक समोर आले आहे.वृत्तांनुसार, यंदाच्या हंगामाचा सलामीचा सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना बेंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे.
धक्कादायक बातमी : इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ…
महत्वाची बातमी : तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता
दरम्यान, देशातील चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे संपूर्ण हंगामाचे वेळापत्रक एकाच वेळी जाहीर न करता टप्प्याटप्प्याने सामने जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या केवळ पहिल्या फेरीतील 20 सामन्यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
IPL 2026: पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक
https://x.com/i/status/2031732874957976053

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Mumbai
पुन्हा रंगणार चौकार-षटकारांचा उत्सव
दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलमध्ये जगभरातील स्टार क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी, केन विल्यमसन, जोस बटलर यांसारखे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, पहिल्याच आठवड्यात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांसारख्या लोकप्रिय संघांचे सामने होणार असल्याने आयपीएलची सुरुवातच धमाकेदार होणार आहे.
आता क्रिकेटप्रेमींची नजर उर्वरित सामन्यांच्या अधिकृत वेळापत्रकाकडे लागली आहे. लवकरच आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल संपूर्ण हंगामाची घोषणा करण्याची शक्यता आहे.









