जळगाव,(प्रतिनिधी):जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत लोणवाडी बु., ता. जि. जळगाव येथे ग्रामसेवक तसेच सरपंच मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्यामुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात मोठा अडथळा निर्माण होत असून यामुळे नागरिकांना वेळेवर शासकीय सेवा मिळत नसल्याची तक्रार ॲड.अरुण शिवाजी चव्हाण यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार अर्जाद्वारे दिनांक ३० सप्टेंबर रोजी केली आहे.

ॲड.अरुण चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “ग्रामसेवक व सरपंच मुख्यालयी न राहिल्यामुळे ग्रामपंचायतीतील महत्वाचे कामकाज उशिरा होत आहे,यामुळे शासकीय कामकाज प्रभावित होत आहे.”
शासनाचे नियम पाळले जात नाहीत
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रक क्रमांक पंरास 2018/प्र.क्र.488/आस्था-7, दिनांक 9 सप्टेंबर 2019 नुसार ग्रामीण भागातील शासकीय कर्मचार्यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक आहे, विशेषतः ग्रामसेवकांसाठी. तथापि, सदर नियमांचे पालन होत नसल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या वाचा….
ग्रामसेवकाकडून माहिती अधिकार कायद्याला ‘फाटा’
माहिती दडवल्याने संशयाला ‘वाटा’
शासकीय कर्मचाऱ्यांचा मुख्यालयी वास्तव्यास न राहणे ही सार्वजनिक सेवेत बाधा आणण्याची बाब मानली जाते. प्रशासन नियम 2019 नुसार आवश्यक ती चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्यास बाध्य आहे. या प्रकारे कारवाई केल्याने ग्रामस्थांच्या हितासाठी शासकीय कामकाज सुरळीत राहू शकते.
ग्रामस्थांनी यामुळे नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
लोणवाडी ग्रामपंचायत : ‘त्या’ ठरावावर ७ सदस्यांचा आक्षेप, सरपंच-ग्रामसेवक अडचणीत?
https://najarkaid.com/latest-marathi-news/
कायदा काय आहे
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रक क्रमांक पंरास 2018/प्र.क्र.488/आस्था-7, दिनांक 9 सप्टेंबर 2019 नुसार ग्रामसेवकांना मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न केल्यास ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होतात आणि प्रशासन नियमांचे उल्लंघन मानते.
लोणवाडी ग्रामपंचायत ; घरकुल यादीतून लाभार्थ्यांचे नाव वगळले, प्रोसिडींग बुक मध्ये खाडाखोड
सरपंच, ग्रामसेवका विरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
👇🏻
https://najarkaid.com/gramsevak-tharav-sanshay-grampanchayat/
सरपंचसंबंधी कायद्याने थेट मुख्यालयी वास्तव्यास बंधनकारक ठरवलेले नाही, तरी प्रशासन व मार्गदर्शक तत्त्वांनुसार सरपंचाने ग्रामपंचायत कार्यालयात नियमित उपस्थित राहणे अपेक्षित आहे. गैरहजेरीमुळे स्थानिक कामकाजात उशीर होणे व नागरिकांना शासकीय सेवा मिळण्यात अडचणी येणे प्रशासनासाठी गंभीर समस्या ठरते.
याप्रकारे ग्रामसेवक व सरपंच यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थांच्या हितास धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाला तातडीने चौकशी करून योग्य शिस्तभंगाची कारवाई करणे गरजेचे आहे.
लोणवाडी ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक यांनी आधीच घरकुल योजनेतून पात्र लाभार्थ्यांची नावे वगळल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य व लाभार्थ्यांकडून करण्यात आला होता. या प्रकरणात सात सदस्यांनी थेट आक्षेप घेत सरपंच व ग्रामसेवकांनी परस्पर ठराव केल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे केली असून ठराव रद्द करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. या वादानंतर माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत मागवलेली माहितीही ग्रामसेवकाने न देत दडपून ठेवल्याचे समोर आले होते. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक अडचणीत येण्याची शक्यता वाढली असून ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या पारदर्शकतेबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे दरम्यान ग्रामसेवक व सरपंच मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार ॲड.अरुण शिवाजी चव्हाण यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली असून प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.










