पत्नीचा मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याच्या संशयातून संतप्त झालेल्या पतीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघड झाले असून पोलिसांनी तपास करत पती-पत्नीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक ३ येथे एका तरुणाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईलमध्ये असलेल्या अश्लील व्हिडिओच्या कारणावरून पती-पत्नीने संगनमताने तरुणाचा खून केला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
विजय भिमा राठोड असं मयत तरुणाचे नाव आहे. तर संजय परशुराम जाधव व सोनाली संजय जाधव असं अटक केलेल्या पती,पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी काय आहेत घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत विजय राठोड याने आरोपी सोनाली जाधव हिचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याची माहिती तिच्या पती संजय जाधव याला मिळाल्यानंतर दोघांमध्ये संताप निर्माण झाला. याच कारणावरून विजयचा कायमचा बंदोबस्त करण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
२४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजेच्या सुमारास आरोपींनी विजयवर हल्ला करून त्याची हत्या केली. गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांनी मृतदेह अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची विल्हेवाट लावल्याचेही समोर आले आहे. विजय काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला होता. तपासादरम्यान संशयाची सुई संजय जाधव व त्याची पत्नी सोनाली यांच्याकडे वळल्याने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

याप्रकरणी मृत विजयचा भाऊ संजय भीमा राठोड (वय २५) यांनी फिर्याद दिल्यानंतर पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत १३ मार्च संजय जाधव आणि सोनाली जाधव या दोघांना अटक केली. दरम्यान, विजय राठोड याची हत्या नेमकी कशी करण्यात आली आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावण्यात आली याचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली असून अश्लील व्हिडिओच्या कारणावरून घडलेल्या या हत्येची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब
झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल
तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!
Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!
धक्कादायक बातमी : इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ…
महत्वाची बातमी : तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला
Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती










