Personal Finance | CIBIL Score Loan – सरकारने संसदेत स्पष्ट केले की कर्जासाठी CIBIL स्कोअर बंधनकारक नाही. RBI च्या नियमांनुसार पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांना स्कोअर तपासला जाणार नाही.
भारतातील बँकिंग व्यवस्था आणि कर्ज वितरण प्रक्रियेत CIBIL स्कोअर हा नेहमीच एक महत्त्वाचा घटक मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक शिस्तीचे व कर्ज परतफेडीचे मूल्यमापन करण्यासाठी CIBIL स्कोअरचा आधार घेतला जातो. पण याच निकषामुळे अनेक वेळा चांगले उत्पन्न असूनही अनेकांना कर्ज नाकारले गेले आहे. आता केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे की CIBIL स्कोअर हा कर्ज मंजुरीसाठी अनिवार्य निकष नाही. यामुळे अनेक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
CIBIL स्कोअर म्हणजे काय?
CIBIL (Credit Information Bureau India Limited) हा व्यक्तीचा कर्ज व परतफेडीचा इतिहास दाखवणारा आकडा आहे.हा स्कोअर 300 ते 900 या दरम्यान असतो.स्कोअर जितका 900 च्या जवळ, तितका कर्ज घेण्याचा आणि मोठी रक्कम मिळवण्याचा मार्ग सोपा होतो.परंतु स्कोअर 600 च्या खाली असल्यास बँका सावध होतात.Personal Finance
सरकारचा खुलासा : कर्जासाठी CIBIL स्कोअर बंधनकारक नाही
लोकसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की:रिझर्व्ह बँकेने (RBI) त्यांच्या नियमावलीत कुठेही CIBIL स्कोअरचा किमान आकडा निश्चित केलेला नाही.जर एखाद्याचा स्कोअर कमी किंवा खराब असेल तरी बँक थेट कर्ज नाकारू शकत नाही.विशेषतः पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा स्कोअर तपासण्याची बंधनकारकता नाहीयाचा थेट फायदा कोणाला होणार?Personal Finance
1. पहिल्यांदा कर्ज घेणारे युवक व ग्राहक
2. ज्यांचा CIBIL स्कोअर खराब किंवा कमी आहे
3. ग्रामीण व निम्नवर्गीय ग्राहक ज्यांच्याकडे क्रेडिट हिस्टरीच नाही
4. छोटे व्यापारी, शेतकरी व मध्यमवर्गीय ज्यांना व्यवसाय, शिक्षण, घर किंवा वाहनासाठी कर्ज घ्यायचे आहे.
CIBIL स्कोअर असूनही बँकांचा अंतिम निर्णय
बँका केवळ स्कोअरवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे स्रोत, नोकरीतील स्थिरता, मालमत्ता, हमीदार यांचा विचार करून कर्ज मंजूर करू शकतात.म्हणजेच, स्कोअर कमी असला तरी जर अर्जदाराची परतफेडीची क्षमता विश्वासार्ह असेल तर कर्ज मंजुरी शक्य आहे.Personal Finance
ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती
RBI च्या अधिकृत वेबसाईटवर कर्ज व क्रेडिट स्कोअर संदर्भातील सर्व माहिती मिळू शकते.
👉 https://www.rbi.org.in
निष्कर्ष
सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे लाखो ग्राहकांसाठी कर्ज घेण्याचे दरवाजे खुले झाले आहेत. आता बँकांना CIBIL स्कोअरच्या आधारावर थेट कर्ज नाकारता येणार नाही. अर्थात, कर्ज मंजुरीची अंतिम प्रक्रिया बँकेच्या तपासणीनुसारच होणार असली तरी CIBIL स्कोअर नसतानाही कर्ज मिळू शकते, हा बदल ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. Personal Finance
Latest news :
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?
तुमचा क्रेडिट स्कोर लो आहे का? पर्सनल लोन मिळवण्यासाठी या 6 ट्रिक्स ठरतील उपयोगी!
SIP मध्ये होणाऱ्या गुंतवणूक करतांना या ५ चुका टाळा,अन्यथा…
US Visa Interview Waiver बंद : भारतीय विदयार्थ्यांवर थेट परिणाम,अमेरिकेने घेतला मोठा निर्णय!
महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?
महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
हे पण वाचा :- Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
हे पण वाचा :- Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!










