जळगाव : देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती व खान्देशच्या कन्या आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिमो स्व. दादा सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे रक्तदान शिबिर शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हिंदूसूर्य महाराणा प्रताप स्मारक चौक, प्रभात चौक, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महामंडलेश्वर श्री स्वामी जनार्दन हरी जी महाराज (फैजपूर) यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमास डॉ. के. बी. पाटील, उदयसिंह पाटील (जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन प्रवीणसिंह पाटील (श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, व प्रवीण सपकाळे राज्य कार्याध्यक्ष – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई / प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमासाठी सौजन्य म्हणून भगवानसिंह खंडाळकर (साई मल्टी सर्व्हिसेस, जळगाव), विलाससिंह पाटील (मुक्ताईनगर), राजपूत परिवार खान्देश टीम महाराष्ट्र, संग्रामसिंह सूर्यवंशी (संस्थापक अध्यक्ष – राजपुताना प्रीमियर लीग), डॉ. विजयसिंह राजपूत (बोदवड आत्मसन्मान फाउंडेशन, बोदवड), विश्वजित सिसोदिया सर (महाराणा उत्सव समिती जामनेर / वसुंधरा फाउंडेशन मोयगाव, पिंपळगाव गोलाईत, जामनेर), जितेंद्र पाटील (आरोग्यंम धनसंपदा फाउंडेशन, कल्याण), शैलेश आप्पा ठाकरे (जय शंभूनारायण फाउंडेशन, जळगाव), मा. सुशांतसिंह जाधव (स्पोर्ट पाचोरा), सुरेशसिंह राजपूत (पृथ्वीराज फाउंडेशन, जळगाव), विठ्ठलसिंह मोरे (सुप्रीम मित्र परिवार, जळगाव), विजयसिंह राजपूत (दीपा इंडस्ट्रीज, जळगाव), संदीपभाऊ पाटील (देवपिंप्री, जामनेर), ज्ञानेश्वरभाऊ पाटील (संचालक, बाजार समिती बोदवड), वैभवसिंह जाधव (संचालक, स्वामी ग्राफिक्स, जळगाव), विकास राजपूत (आरोग्यदूत, जळगाव), भरतसिंह आप्पा पाटील (नगरसेवक, बोदवड), संतोषभाऊ बारी (जामनेर), कॅप्टन राजेंद्रसिंह (खान्देश प्रवक्ते), विक्रमसिंह पाटील (महाराणा प्रतापसिंह उत्सव समिती, बोदवड), दिलीपसिंह पाटील (उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा काँग्रेस), जितेंद्रभाऊ गवळी (शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, उत्तर महाराष्ट्र), प्रमोदसिंह पाटील (जिल्हाप्रमुख, पत्रकार संघटना), नरेंद्रसिंह पाटील (गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर), जयदीप पाटील (नोबेल फाउंडेशन, जळगाव), विक्की ईश्वर राजपूत (महानगर अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष, जळगाव शहर – अजितदादा पक्ष), दामोदरसिंह राजपूत (महाराणा प्रतापसिंह उत्सव समिती, भुसावळ), संदीपसिंह राणा (महाराणा प्रतापसिंह उत्सव समिती, भुसावळ), अतुलसिंह हाडा (माजी नगरसेवक, मनपा जळगाव), विलासभाऊ राजपूत (वराडसिम, भुसावळ – तालुका प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस), विशाल देशमुख (विचार वारसा फाउंडेशन), .महेंद्रसिंह पाटील (श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, जळगाव जिल्हा प्रमुख), रोशनसिंह राजपूत (राजपुताना युवा उत्सव समिती, जळगाव), आशिष पाटील (विचार वारसा फाउंडेशन), अभिजित पाटील (विचार वारसा फाउंडेशन) यांची उपस्थिती लाभणार आहे.
तसेच महाराणा प्रतापसिंह स्मारक समिती संचालक मंडळ, जळगाव, सर्व उद्योजक, समाजबांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.














