जळगाव | नजरकैद न्यूज –
जळगाव महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवार गायत्री इंद्रजित राणे यांच्यासह अनिल अडकमोल, नितीन बरडे यांच्या प्रचारार्थ समता नगर परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांनी उपस्थिती लावत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला बळ दिले.यावेळी नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

या प्रचार रॅलीत प्रभाग क्रमांक 12 (क) मधून भाजपा महायुतीच्या उमेदवार गायत्री इंद्रजित राणे यांच्यासह प्रभाग 12 (अ) मधून अनिल सुरेश अडकमोल, प्रभाग 12 (ड) मधून नितीन मनोहर बरडे हे उमेदवार सहभागी झाले होते. तसेच प्रभाग 12 (ब) मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपा महायुतीच्या उमेदवार सौ. उज्वला मोहन बेंडाळे या देखील रॅलीत सहभागी झाल्या होत्या. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. समता नगर परिसरातून काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान घोषणाबाजी करत महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ वातावरण तयार करण्यात आले.
या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 12 मध्ये निवडणूक प्रचाराला अधिक वेग मिळाल्याचे चित्र आहे.









