जळगाव, दि. ९ जानेवारी २०२६ — जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार अधिक तीव्र झाला आहे. ७ व ९ जानेवारी रोजी प्रभागातील विविध भागांत प्रचार फेरी, पदयात्रा व नागरिकांशी थेट संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या प्रचारात प्रभाग १२(क) मधून गायत्री इंद्रजीत राणे, १२(ड) मधून नितीन मनोहर बरडे आणि १२(अ) मधून अनिल सुरेश अडकमोल हे उमेदवार सहभागी झाले होते. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस राहुल वाघ, भाजप जळगाव मंडळ क्रमांक ३ चे (सरदार वल्लभभाई पटेल मंडळ — रामानंद नगर व महाबळ परिसर) अध्यक्ष अजित राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रचारादरम्यान रणजीत राणे, डॉ. विजय फिरके, जयंत राणे, निरंजन नेमाडे, इंद्रजीत राणे, पंकज पाटील, योगेश भंगाळे, यतीन पाटील, जगदीश जावळे, किरण भोळे, उमेश भोळे, हेमराज येवले, दीपक लोखंडे, सुरज चौधरी, नीरज बरडे, पियुष महाजन, भावेश कोल्हे, केतन अत्तरदे, पवन शिरसाळे, रवींद्र पाटील, दिपेश देशमुख, रोहित देवरे, तन्मय राणे, अजय चौधरी, विलास राणे, सोनू पाटील, सागर ढेगे, संजय अत्रे, राजेश शिरसाठ, सचिन अडकमोल, बबलु शिंदे, राजेश साळुंखे, नरेंद्र मोरे, सचिन बोरसे, मिलिंद नारखेडे, खुशाल महाजन, संकेत कापसे, संतोष भंगाळे, ललित पाटील, संतोष पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रामदास कॉलनी, प्रभात चौक, जय नगर, विद्या नगर, गुरुकुल कॉलनी तसेच ओम कारेश्वर मंदिराजवळील संपूर्ण परिसरात घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधण्यात आला. उमेदवारांनी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व नागरिक सुविधांबाबत आपली विकासदृष्टी मांडली.
नागरिकांकडून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.









