जळगाव (२४ सप्टेंबर २०२५) :लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आज जळगावात सापळा रचून एक मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव येथे कार्यरत असलेले क्षेत्र अधिकारी (वर्ग-०२) राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी (वय ४२) यांना आणि त्यांचे साथीदार खाजगी इसम मनोज बापु गजरे यांना १५,००० रुपयांच्या लाच प्रकरणी रंगेहात पकडण्यात आले आहे.
प्रकरणाची थोडक्यात माहिती :
रावेर येथील एका हॉस्पिटलच्या बायो-वेस्ट प्रमाणपत्रासाठी सुर्यवंशी यांनी त्रुटी दाखवत तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने नाशिक कार्यालयातून प्रमाणपत्र काढून घेतल्यानंतर जळगाव कार्यालयातील अर्ज मागे घेण्यासाठी गेले असता, सुर्यवंशी यांनी १५,००० रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देऊन दिनांक २३ सप्टेंबर रोजी ACB कडे तक्रार नोंदवली. पडताळणीनंतर आज २४ सप्टेंबर रोजी सापळा रचण्यात आला. त्यावेळी सुर्यवंशी यांच्या सूचनेनुसार खाजगी इसम मनोज गजरे यांनी तक्रारदाराकडून १५,००० रुपये स्वीकारले. त्यानंतर तात्काळ दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा नोंद :
- गुन्हा नोंद क्रमांक : जळगाव पोलीस ठाणे गु.र.नं.२७९/२०२५
- कायदेशीर कारवाई : भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ७, ७(अ) व १२
- आरोपी :
- राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी, वय ४२, क्षेत्र अधिकारी, वर्ग-०२, रा. धात्रक फाटा, पंचवटी, नाशिक.
- मनोज बापु गजरे, खाजगी इसम.
तपास पथक :
- पर्यवेक्षण अधिकारी : श्री. योगेश ठाकूर, उपअधीक्षक, ACB
- सापळा व तपास अधिकारी : श्री. हेमंत नागरे, पोलिस निरीक्षक
- सहाय्यक : पोना बाळु मराठे, पोशि भुषण पाटील
वरिष्ठ मार्गदर्शन :
- श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र
- श्री. माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र
- श्री. सुनील दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र
नागरीकांसाठी आवाहन :
लाच मागणाऱ्या कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
- पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव
- संकेतस्थळ : acbmaharashtra.gov.in
- ई-मेल : spacbnashik@mahapolice.gov.in, dyspacbjalgaon@gmail.com
- ऑनलाईन तक्रार : acbmaharashtra.net
- टोल फ्री क्रमांक : 1064
- फोन क्रमांक : 0257-2235477













