चाळीसगाव, (प्रतिनिधी)येत्या अक्षयतृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे कुंभार समाजाने दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो रुपयांचा घागरी, मातीचे माठ , रांझण आपल्याच समाज बांधवांकडे अपेक्षित मालाची आगाऊ रक्कम देऊन बुकिंग करून ठेवली होती तसेच संबधित कुंभार समाज बांधवाने हा संभाव्य पूजेचा माल तयार देखील करून ठेवला होता मात्र सध्याच्या लॉक डाऊन परिस्थितीत बाहेर पडणे मुश्किल असल्याने ही खरेदी विक्री बंद करता येणे शक्य नसल्याने कुंभार समाज परिवार हवालदील झाला होता.आज या समाजाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांची भेट घेऊन परवानगी मिळवून देण्यासाठी निवेदन देत समाजाची कैफियत मांडली खासदार उन्मेश दादा पाटील यांनी मनमाड नगरपरिषदेने कुंभार समाजास दिलेल्या परवानगी प्रमाणे खरेदी विक्रीची मुभा द्यावी अशी मागणी चाळीसगाव नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार अमोल मोरे यांचे कडे केली त्यांनी तात्काळ याबाबत कार्यवाही करतो असे सूचित केल्याने कुंभार समाज शिष्टमंडळाच्या मोजक्या प्रतिनिधींशी उद्या चर्चा करून तोडगा काढतो असे सांगितल्याने कुंभार समाज बांधवांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे समाधान व्यक्त करीत आभार मानले. यावेळी अध्यक्ष श्री. अशोक निंबा वाघ, उपाध्यक्ष श्री आनंदा पवार, सचिव श्री राहुल बोरसे, मार्गदर्शक श्री. विजय पगारे, दौलत चव्हाण, सुभाष पगारे, अनिल चित्ते, कैलास चित्ते, संतोष पगारे यांच्या सह माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी ,नरेंद्र काका जैन, रवी आबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
———
*खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कुंभार समाज बांधवांची अडचण प्रशासनाकडे मांडली*
ते म्हणाले की कुंभार समाजाला कोरोनाच्या आजारामुळे सद्यस्थितीची पूर्ण कल्पना असून वर्षभरात अधिकाधिक उत्पन्न देणारा हा एप्रिल मे हा उन्हाळ्याचा महिना असल्याने गेल्या वर्षभराचे आर्थिक बजेट हा हंगामावर अवलंबून असते या पारंपारीक व्यवसायाच्या उत्पन्नावरच कुटुंबाचे पालनपोषण, मुलांच्या शिक्षणाच्या गरजा भागविण्याकरीता मोठी मदत होते. तीन चार महिन्यांपासून मोठ्या कष्टाने त्यांनी हे माठ घागरी तयार करून ठेवल्या आहेत. त्यातच त्यांना या वस्तूंची खरेदी विक्री करता येणार नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न पाहता त्यांच्या बद्दल सहानुभूती दाखवत,प्रशासन देईल त्या जागेवर, कायद्याचे पालन करीत,सोशल डिस्टन्स व दिलेल्या आरोग्याच्या उपाययोजना सूचना अंमलात आणण्याच्या अधीन राहून त्यांना परवानगी देण्यात यावी.अशी समाजाची कैफियत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी शासनाच्या लक्षात आणून देत कुंभार समाजाला परवानगी द्यावी अशी मागणी केली. त्यामुळे कुंभार समाजास परवानगी मिळणार असल्याने समाजात उन्मेश दादा यांच्या परखड भूमिकेचे कुंभार समाज बांधवांनी स्वागत करीत आभार मानले आहेत.