वरणगावं,(प्रतिनिधी):- देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना हा महासंकटात सर्वसामान्य जनतेला रेशनकार्ड लाभार्थ्यांना प्रति वेक्ती 5 किलो प्रमाणे तांदूळआज वरणगाव शहरात लाभार्त्यांना वाटप करण्यात आली या प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे उपनगराध्यक्ष शेख आखलाक कामगार नेते मिलिंद मेढे इरफान पिंजारी अजय पाटील , संजय कुमार जैन शामराव धनगर सुनील माळी हितेष चौधरी रमेश पालवे यांनी नागरिकांना मोदी साहेबांनी पाठवलेल्या मोफत धान्य विचारणास मदत केली यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की आज कोरोना ह्या महासंकटात प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत माझ्या वरणगाव शहरातील जनतेला
हा मोफत धान्याचा आधार अमृता सारखा वाटत आहे नागरिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देत होते खिडकी वाडा भगवान वंजारी , मोठी होळी येथे अशोक प्रधान , गांधी चौक येथे श्री पी जे चौधरी, शेतकी संघात श्री निकम , सिद्देशवर नगरात श्री ननावरे दुकानदार उपस्तिथ होते.