परेश फाऊंडेशन व साईमतचा संयुक्त स्तुत्य उपक्रम शहरातील शेकडो गरजू व्यक्तींना अन्नदान वाटप
जळगाव, (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉकडाऊन घोेषित करुन संचारबंदी लावल्याने शहरातील गरजू व्यक्तींना पोटाची खळगी कशी भरावी,अशी चिंता वाढली.त्यांना जेवणापासून वंचित रहावे लागत आहे. त्याविषयाचे गांभीर्य लक्षात घेऊऩ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या परेश फाऊंडेशन व साईमतने संयुक्त उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार आज दिवसभर शहरातील विविध भागातील शेकडो गरजू व्यक्तींना अन्नदान वाटप करण्यात आले.
शहरातील गुजरात पेट्रोल पंप परिसर, शिव कॉलनी परिसर, गणेश कॉलनी, आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौफुली, अजिंठा चौफुली, रेल्वे स्टेशन परिसर, कालिंकामाता परिसर याठिकाणी बेघर व गरजू व्यक्तींना अन्नदानाचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकडो गरजूंनी या अन्नदानाचा लाभ घेतला. यावेळी सायंदैनिक‘साईमत’चे संपादक प्रमोद बर्हाटे, परेश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश बर्हाटे, साईमत लाईव्हचे प्रतिनिधी संतोष ढिवरे यांच्याहस्ते गरजूंना अन्नदान वाटप करण्यात आले.