जळगांव, (विशेष प्रतिनिधी) शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालय,शिवाजी नगर व लाड वंजारी मंगल कार्यालय येथील शासकीय निवारागृहातील स्थलांतरित नागरिकांना प्रशासनाच्या वतीने कोरोना पासून प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत काळजी घेण्यासाठी समुपदेशन देण्यात येत आहे.त्यामुळे या नागरिकांमध्ये जनजागृती होऊन कोरोना सोबत लढण्याची ऊर्जा या ठिकाणी नागरिकांना मिळत असल्याचे आज पाहायला मिळाले.
याबाबत सविस्तर असे की, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे, यांच्या सूचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने स्थलांतरित नागरिकांना शहरातील शासकीय निवारागृहात ठेवण्यात आले आहे.
याठिकाणी असलेल्या नागरिकांना दोन वेळच्या जेवणासह, नास्ता व इतर आवश्यक सुविधा पुरविल्या जात असल्यातरी त्यासोबतच जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शन नुसार विद्या सोनार, भारती म्हस्के, विठ्ठल पाटील , पांडुरंग पाटील यांनी या नागरिकांना समुपदेशन करून कोरोना सोबत लढण्याची ताकत दिली. यावेळी निवासी कॅम्प मधील नागरिकांनी समुपदेशन कर्त्यांचे व मनोबल दृढ करणेसाठी प्रशासनाचे देखील आभार मानले.
यावेळी जिल्हा प्रशासनच्या वतीने जळगाव शहरचे मंडळ अधिकारी योगेश नन्नावरे, तलाठी रमेश वंजारी, सचिन माळी हे या ठिकाणची संपूर्ण चोख जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून आले.