Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात १५ नवीन करोना बाधित रुग्ण : राज्यातील एकूण रुग्ण संख्या ८९ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

najarkaid live by najarkaid live
March 23, 2020
in आरोग्य
0
राज्यात आणखी ४ जण करोना बाधित रुग्ण आढळले !
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई, दि. २३: राज्यात नवीन १५ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ११ जण मुंबईतील तर प्रत्येकी एक रुग्ण पुणे, ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबई भागातील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८९ झाली आहे. मुंबई आणि परिसरात आढळलेल्या १४ नवीन रुग्णांपैकी ९ जण हे यापूर्वीच्या कोरोना बाधित रुग्णांचे निकटसहवासित आहेत. इतर ५ जणांनी दुबई, मलेशिया, थायलंड, श्रीलंका,ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी देशात प्रवास केल्याचा इतिहास आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

दिनांक १३ मार्च २०२० रोजी कस्तुरबा रुग्णालयात भरती झालेल्या ५९ वर्षीय फिलीपाइन नागरिकाचा काल रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला. सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या रुग्णाचे नंतरचे दोन नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले होते म्हणजे त्याचा कोरोनो हा आजार बरा झाला होता तथापि त्याला असलेल्या मधुमेह आणि अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा:

पिंपरी चिंचवड मनपा १२
पुणे मनपा १६
मुंबई ३५
नवी मुंबई ५
नागपूर, यवतमाळ, कल्याण प्रत्येकी ४
अहमदनगर, ठाणे प्रत्येकी २
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार प्रत्येकी १

एकूण रुग्ण ८९ मृत्यू २

राज्यात आज परदेशातून आलेले २५५ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. ज्यांना दि. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आली अशा २१४४ जणांना राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १८८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आरोग्य खात्यामार्फत आवाहन

काल राज्यभर पाळण्यात आलेल्या जनता कर्फ्युनंतर पुणे – मुंबई मधील बरेच लोक आपापल्या गावी जाताना दिसत आहेत. काही ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या लोकांबद्दल भितीचे वातावरण आहे, या लोकांची करोना टेस्ट करुन घ्यावी, किंवा त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्का मारण्यात यावा, अशी मागणी काही तुरळक ठिकाणी होताना दिसते आहे. पुणे आणि मुंबईमध्ये काही करोना बाधित रुग्ण आढळलेले असले तरी या भागातून येणा-या लोकांबद्दल विनाकारण भिती बाळगण्याचे कारण नाही.

अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिकांनी ओपीडी बंद ठेवल्याचे आढळले आहे. अशा उद्रेक काळात उद्रेकाशिवाय इतर आरोग्य सेवा तसेच तातडीची वैद्यकीय सेवा जनतेला मिळणे आवश्यक असल्याने कोणीही ओपीडी अथवा इतर आरोग्य सेवा बंद ठेवू नयेत असे कळकळीचे आवाहन आरोग्य खात्यामार्फत करण्यात आले आहे.

• नुकतेच परदेशाहून आलेले काही नागरिक होम क्वारंटाईन न पाळता घराबाहेर पडताना दिसत असल्याबाबतच्या तक्रारी राज्य हेल्पलाईनला प्राप्त होत आहेत. स्थानिक प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्राचे विभागवार वाटप करुन प्रत्येक क्षेत्रासाठी जबाबदार अधिका-याला होम क्वारंटाईन व्यक्तींची यादी देऊन प्रत्येकजण नियमाप्रमाणे विलगीकरण सूचनांचे पालन करत आहे,याची खातरजमा करावी. यासाठी निवासी सोसायटीच्या समित्यांचीही मदत घेण्यात यावी.
राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात आणखी ४ जण करोना बाधित रुग्ण आढळले !

Next Post

कोरोना पासून खबरदारी म्हणून पत्रकार संतोष पाटील यांनी स्वखर्चातून केली फवारणी!

Related Posts

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
जाणून घ्या हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे

जाणून घ्या हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे

December 30, 2023
Omicron corona Variant Jn1; कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने टेन्शन वाढवलं,२९२ रुग्णांची नोंद तर ४५ सक्रिय रुग्ण

Omicron corona Variant Jn1; कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने टेन्शन वाढवलं,२९२ रुग्णांची नोंद तर ४५ सक्रिय रुग्ण

December 21, 2023
Ayushman Cards ; ‘या’ गंभीर आजारावर आता ५ लाखापर्यंत मोफत उपचार ; असा घ्या लाभ

Ayushman Cards ; ‘या’ गंभीर आजारावर आता ५ लाखापर्यंत मोफत उपचार ; असा घ्या लाभ

December 9, 2023
हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज…!

हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज…!

November 21, 2023
थंडीचा कडाका वाढणार, आहारात करा या भाज्यांचा समावेश

थंडीचा कडाका वाढणार, आहारात करा या भाज्यांचा समावेश

November 4, 2023
Next Post
कोरोना पासून खबरदारी म्हणून पत्रकार संतोष पाटील यांनी स्वखर्चातून केली फवारणी!

कोरोना पासून खबरदारी म्हणून पत्रकार संतोष पाटील यांनी स्वखर्चातून केली फवारणी!

ताज्या बातम्या

Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us