पाचोरा (प्रतिनिधी):– जळगाव तरुण भारत प्रतिनिधी श्री.सुरेश धनराज तांबे (पाचोरा) यांची ग्रामीण पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे ही निवड राज्य अध्यक्षा श्रीमती चंदाताई पी.शिरसाठ यांच्या आदेशानुसार विभागीय अध्यक्ष राजुभाई जावरे यांनी केली असून तसे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कापडणे,,सचिन पाटील,उत्तर महाराष्ट्र सहसचिव सचिन चौधरी,उत्तर महाराष्ट्र संघटक चंदू खरे,जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील,जळगाव जिल्हा संघटक तथा ग्रामीण बहुजन दणका कार्यकारी संपादक राकेशभाई जावरे, जळगाव जिल्हा संघटक जावेद शेख,पाचोरा विभागीय अध्यक्ष श्री जगताप,फिरोज देशमुख,पारोळा तालुकाध्यक्ष रवींद्र निकम,गौतम पवार,शुभम पवार,विशाल बागुल,निलेश कापडणे आदी ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते
श्री सुरेश तांबे यांची उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचे विभागीय अध्यक्ष राजुभाई जावरे सह उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच सुरेश तांबे यांचे सर्व स्थरातून अभिनंदन केले जात आहे.