गावोगावी खासदारांचे ग्रामस्थांनी केले स्वागत : जेष्ठांनी केले विशेष कौतुक
चाळीसगाव – अनेक वर्षांपासून जागोजागी खड्डेमय आणि नादुरुस्त असलेल्या चाळीसगाव नागद रस्त्याचे काम व्हावे.यासाठी मोठया प्रमाणात तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेशदादा पाटील यांचेकडे परिसरातील ग्रामस्थ तसेच शहरातील नागरीकांची मागणी होती. अखेर खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून सुमारे चोवीस किलोमीटरचे काम सध्या प्रगतीपथावर असून अंतिम टप्प्यात आहे.आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी या रस्त्याची पाहणी केली.याप्रसंगी नागद चौफुली,वाकडी, हातले,वाघले,जावळे या सर्वच ठिकाणी खासदारांना धन्यवाद देण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
शहरातील सर्वात गजबजलेला नागद चौफुली येथून पाहणीला सुरुवात करण्यात आली.यावेळी केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांचे सॊबत जिल्हा परिषद सदस्य पोपट तात्या भोळे,संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष के बी दादा साळुंखे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते के आर अण्णा पाटील,माजी पंचायत समिती दिनेश बोरसे, नरेंद्र काका जैन आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नागद चौफुली कामाची पाहणी केली.रस्त्याचे काम आणि नव्याने बांधण्यात आलेल्या गटारीचे कामाची माहिती ठेकेदार भोजराज पुंशी यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांना दिली. यावेळी नगरसेवक शाम देशमुख ,नगरसेवक शेखर देशमुख ,माजी नगरसेवक विनोद पल्लण,रवीआबा राजपूत, सुनील देशमुख,गिरीश बर-हाटे,कैलास गावडे,मनोज शर्मा,अमित सुराणा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. रस्त्याच्या कामामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून हे ऐतिहासिक काम मंजूर करुन आणल्याबद्दल खासदार उन्मेश दादा पाटील यांचे उपस्थित हिंदू मुस्लिम कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले. तर ग्रामीण भागातील विविध सरपंच पदाधिकारी यांचेसह प्रभाकर सोनवणे, रमेश पाटील, नंदू जावळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदारांचे ठिकठिकाणी स्वागत
चांदवड मनमाड नांदगांव चाळीसगाव नागद अंजिठा बैतुल रस्ता हायब्रीड अॅन्युटी अंतर्गत या २४ किलोमीटर रस्त्याचे कामासाठी एकूण ४८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.या रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी मोठ्या पुलाचे काम झाल्याने दळणवळण अतिशय सुकर झाले असून या मार्गावरील वाघडू ,वाकडी, रोकडे, हातले,वाघले चौफुली, चांभार्डी,जावळे, मजरे, जामडी यासह परिसरातील वाहनधारक व गावकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रत्यक्ष भेटून धन्यवाद दिले.