जळगाव – मू.जे महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे गुरुवार 12 रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त अभ्यास केंद्रातील प्राध्यापक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.एन.भारंबे यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य भारंबे तसेच एम., बी.ए चे केंद्रसंयोजक डॉ. ए. पी. सरोदे, समंत्रक डॉ. जयश्री महाजन प्रा के. के. वळवी, प्रा. संजय हिंगणेकर, केंद्र सहाय्यक प्रवीण बारी, रवी पाटील यांच्यासह इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.