जीर्ण खोल्यांमध्ये विद्यार्थ्याची भरते शाळा ; आमदारांचे दुर्लक्ष
जळगाव-आमदार डॉ. सतीश पाटील यांनी तामसवाडी कन्या शाळा दत्तक घेऊन देखील शाळेची दुरवस्था झाली आहे. येथील कन्या शाळेचे दोन वर्ग अक्षरशः जीर्ण खोल्यांमध्ये भरले जातात.
आमदार सतीश पाटील यांनी शाळा दत्तक घेतल्याचे समजते. मात्र शाळेच्या दुरवस्थेकडे आमदारांचेच दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून आले आहे . यामुळे बेटी बचाव बेटी पढाव या संकल्पनेला तडा गेल्याचे बोलले जात आहे. आमदार तामसवाडी येथे येतात दुरूनच चौकशी करून जातात असे बोलले जात आहे. सध्या भर पावसाळ्याचे दिवस असून भिंत कोसळण्यासह इतर घटना घडत असल्याने विद्यार्थिनींचे काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.