अमळनेर – सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ मोरे यांनी आपले सामाजिक दाइत्व जपून नगरपालिकेच्या माध्यमिक शाळेतील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांनां वडिलांच्या स्मुर्तिप्रित्यर्थ 6000 रुपये किमतीचे वह्या-पुस्तकांचे वाटप केले.
अमळनेर तालुका हा दुष्काळ ग्रस्त असल्याने खेड्या-पाड्यात हाताला काम नसल्याने मुलांच्या पालन पोषणाचा प्रश्न पालका पुढे निर्माण असतांना शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी मुलांना शाळेत जायला व शिक्षण देतांना लागणाऱ्या वह्या पुस्तकांचा खर्च नपरडवणारा असल्याने मुले शिक्षण घेण्यापासून वंचीत राहू नये म्हणून अमळनेर नगरपालिकेत सफाई कामगार व सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या रघुनाथ मोरे यांनी सामाजिक बाधिंलकी जपत शाळेतील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांनां वडिलांच्या स्मुर्तिपित्यार्थ शहराच्या पोलिसकवायत मैदाना समोरील नगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्याना वह्या पुस्तकांचे वाटप केले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रुपचंद पार, नवल बिर्हाडे, वरिष्ठ पत्रकार गौतम बिर्हाडे, मुख्याध्यपक वसंत महाजन, विनोद जाधव, राजू चँडाळे,उपशिक्षक एम इ सोनवणे, आर एस महाजन, सी एस करस्कार, एन ए कासार, एस एस महाजन (लिपिक), एस एस दुसाने(ग्रंथपाल), एस व्ही मराठे, भास्कर माळी इत्यादी उपस्थित होते.