अमळनेर – अमळनेर येथील जिजाऊ बहुउद्देशीय संस्था च्या वतीने 10 वी व 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा अन्नपूर्णा मंगल कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी सह पालकांच्या उपस्थितीत पार पडला
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षा मध्ये सहभाग घेताना चौकस असणे आवश्यक आहे, जगात घडणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणे , ग्रुप मध्ये चर्चा करणे गरजेचे आहे तसेच मुलांनी नोकरी मिळावी म्हणून शिक्षण घेणे हा उद्देश नसावा तर उद्योजक म्हणून सुद्धा आपली ओळख निर्माण करणे शक्य आहे,
शिक्षणा मुळे नोकरी मिळते असी भावना नठेवता चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे.
मुलीनीं जर ठरवलं तर ते करतातच, कारण महिलां मधील असलेला आत्मविश्वास त्यानां संकटाना सामोरे जाण्याची ताकद देते, असे प्रबोधन केले
यावेळी उपस्थित मुलांशी संवाद साधतानां संस्थेचे संचालीका ऍड ललिता पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्याना प्रेरणादायी जिवन्त उदाहरण देऊन माणूस म्हणून जगण्याची उमेद त्यांच्यात निर्माण केली, पालकांनी आपल्या पाल्याच्या मतानुसार शिक्षण घेऊ द्या, त्यांच्या वर लादू नका, युग हे स्पर्धात्मक आहे त्यात टिकायचे असल्यास वाचन संस्कृती जोपासने महत्वाचे आहे,
या प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अर्बन बँकेचे चेरमन पंकज मुंदडा, व्हा, चेअरमन प्रवीण जैन, संचालिका वसुंधरा लांडगे, संस्थेचे संचालक पराग पाटील, प्रा प्रकाश महाजन इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्विते साठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतल्याचे दिसते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल माळी यांनी केले