रावेर – श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी रावेर या सी बी एस ई इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील नर्सरी, जुनियर केजी सीनीयर केजी च्या विद्यार्थ्यांची रेल्वे स्टेशन व पोलिस स्टेशन ला क्षेत्र भेट उत्साहात संपन्न झाली.
क्षेत्रभेटीमुळे प्रत्यक्ष कृतीमधून शालेय मुलां – मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुध्दिमत्ता रूजवणे व त्यांचा विकास करून उत्तम नागरीक घडवणे हे क्षेत्रभेटीचे मुख्य उद्दीष्टये होते. तसेच नियोजन, नेतृत्वगुण विकास, जबाबदारपणा येतो, परिसरातील ओळख होते, दृष्टीकोन विकसित व्हायला मदत होते व क्षेत्रभेटीत निरिक्षणाला खुप महत्व असते.
प्रथम शालेय विद्यार्थ्यांनी पोलिस स्टेशनला भेट दिली तेथील पोलिस उप निरिक्षक सुनिल कदम यांचेशी विद्यार्थ्यांनी प्रश्नांच्या स्वरूपता संवाद साधला. तसेच क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत पोलिस कामकाजाची माहिती मिळाली, या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपध्दती आणि इतर जबाबदारीची माहिती देण्यात आली, व्यक्तीने केलेल्या चुकीच्या कृत्याबद्दल पोलिस स्टेशनला त्याला शिक्षा होतेच, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात पोलिस प्रशासनाबाबत असलेली भिती, गैरसमज दूर व्हावे, पोलिस कार्यपध्दतीबद्दल माहिती मिळावी हा या क्षेत्रभेटेचा उद्देश होता. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे आणि त्यांच्या मनातील शंकाचे योग्य पध्दतीने निसरन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पोलिसांचे शस्त्रांसह जेल दाखविली. क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण दिसून आले.
तद्नंतर विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशनला भेट दिली. त्यात विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशनचे निरीक्षण व रेल्वे आवागमन सिस्टीमची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानक प्रमुख जीवन कोष्टा, राजेश मीना यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्थानक प्रमुखांशी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून माहिती मिळविली. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक, कोणकोणती गाडी रावेर स्टेशनला थांबते, ट्रॅक सिस्टम बद्दल तसेच झेंड्यांचा उपयोग केव्हा केला जातो, स्टेशनवर घंटानाद गाडी येणाऱ्या कितीवेळ आधी दिला जातो, तिकीट सिस्टम, कोणकोणत्या पदावर व्यक्ती नोकरी करतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विचारून रेल्वे स्टेशन बद्दल माहिती मिळविली. क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन शाळेचे प्रशासक किरण दुबे, प्राचार्या कविता शर्मा, व्यवस्थापक गजानन महाजन यांनी केली.