कमीत कमी दिवसांत नाईट लँडिंग परवानगी मिळणारे देशातील पहिले विमानतळ
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्ली हुन दिली गोड बातमी
जळगाव -रात्रीचे विमानसेवा व खराब हवामाना मुळे अनेकदा विमानसेवेत बाधा निर्माण होत होती त्यातच गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर विमानसेवा विस्कळीत झाली होती. यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी.आणि तातडीने उच्च दर्जाची विमानसेवा प्रवाशांना बहाल करता यावी यासाठी दिल्लीत नागरी विमान मंत्रालयाचे प्रधान सचिव प्रदीपसिंग खरोला यांची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भेट घेतली होती रात्रीची विमानसेवा तसेच खराब हवामानात विमानसेवा सुरू राहावी या सादर केलेल्या प्रस्तावास त्वरित मंजुरी देण्याची मागणी केली आहे. प्रधान सचिव प्रदीप खरोला यांनी कार्यवाही करण्याचे सूचित केले होती.त्यामुळे पुढील नऊ दिवसात उपकरणांच्या चाचणी साठी तज्ञ समितीने भेट दिली. तर गेल्या महिन्यात तज्ञानी नाईट लँडिंग उपकरणे बसविली त्याची पाहणी देखील खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली होती.आज अखेर नाईट लँडिंग परवानगी देण्यात आली असून लवकरच जळगाव विमानतळ येथून रात्र दिवस आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानसेवा सुरू होणार असून जिल्ह्याच्या दळणवळणास मोठी गती मिळेल.कमीत कमी दिवसांत नाईट लँडिंगची परवानगी मिळविणारे जळगाव विमानतळ देशातील एकमेव विमानतळ ठरले असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलीयम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली आहे.
कमीत कमी दिवसांत परवानगी मिळणारे देशातील पहिले विमानतळ
जळगाव विमानतळावर रात्रीच्या विमानसेवेसाठी आणि मुखत्वे खराब हवामानात विमानसेवा सुरळीत चालू राहावी यासाठी सेकंड सर्किट ऑफ रनवे,ग्रेडींग ऑफ रनवे बेसिक स्ट्रीट,पापीज तसेच इतर यंत्रणेची उभारणी करण्यात आली.यासाठी केंद्राच्या तज्ञांची तपासणी आणि चाचणी समिती ने सर्व उपकरणे बसविली याची गेल्याच पंधरवाड्यात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पाहणी करून परवानगी साठी संबधित विभागासह प्रधान सचिव श्री. खरोला यांचेशी संपर्क केला होता
जळगांव विमानतळावरून आवश्यक उपकरणांसह यंत्रणा अद्यावत करून मिळावी ययासाठी सात्यत्याने खासदार उन्मेश दादा पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांनी नागरी उड्डयन मंत्री ना. हरदीपसिंग पुरी यांची वेळोवेळी भेट घेतली व त्यांना निवेदनही दिले होते त्यांनी सर्व समस्या समजून घेत नागरी विमानन महानिदेशक ( Director General Civil Avaition ) यांना आदेश दिले.त्याचा परिणाम जळगाव विमानतळ नाईट लँडिंग परवानगी देण्यात आली आहे.येत्या काळात पुणे व इंदोर तसेच मोठी शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्याबाबत कुठलीही अडचण निर्माण होणार नाही तसेच लवकरच विमानतळावरून जळगावकरांना उच्च दर्जाची विमान सेवा अनुभवता येणार याची उत्सुकता वाढली आहे.
.
आता आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी आग्रही – खा. उन्मेश दादा पाटील
जळगाव विमानतळाच्या नाईट लँडिंग विषयीचा प्रस्ताव मंजूर करून भक्कम पाठपुरावा सुरू ठेवला त्याचा परिणाम आज परवानगी मिळाली याचा मला देखील आनंद आहे यापुढे देखील जळगाव येथून आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानसेवा मिळावी.देशातील जास्तीत जास्त “मेट्रोपोलिटन सिटी कनेक्टीव्हीटी” मिळावी यासाठी प्रयत्न सुरूच राहतील सर्व पातळीवर पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. जळगाव विमानतळ हे देशात आघाडीचे विमानतळ म्हणून विकसित होईल. सर्वसामान्य जनतेला देखील विमानसेवेचा लाभ घेता यावा हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण होणार आहे.अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
खासदार उन्मेश दादांची अग्रेसिव्ह भूमिकेचे व्यापारी वर्गात स्वागत
जळगाव जिल्ह्यात दळणवळणाचा वर्तुळ पूर्ण झाला असून जसे शेजारच्या औरंगाबाद शहरात एम आय डी सी वाढीसाठी विमानसेवेची मोठी भूमिका आहे .मात्र जळगाव येथे व्यापार वृद्धीसाठी पोषक वातावरण असताना केवळ फक्त चांगल्या दर्जाची रात्र दिवस विमानसेवा नसल्याने व्यापारी उद्योजक नाखूष होते त्यांनी ही बाब वेळोवेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे मांडली होती जळगाव विमानतळावर विमानांचे “नाईट लॅंडींग’ व्हावे यासाठी मिशन मोडवर खासदार उन्मेश पाटील काम करावे अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादांनी प्रत्यक्षात उतरवली असून आज केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. त्याबाबतचे पत्रही प्राप्त झाल्याने खासदार उन्मेश दादा ब पाटील यांनी दिल्लीत विशेष पाठपुरावा केल्यानेच परवानगी मिळाल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गात उमटली असून जळगाव अडव्हायझरी कमेटी अध्यक्ष या नात्याने खासदार उन्मेश दादा पाटील यांचे सोशल मीडियावर अभिनंदन केले जाते आहे.