- बोगस शिक्षक भरती प्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा – शिक्षणमंत्री ना.वर्षा गायकवाड
- आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या तक्रारीची दखल
पाचोरा (प्रतिनिधी)– राज्यात अनेक शाळांनी केलेल्या अनधिकृत संचमान्यता घेऊन अनुदानित पदांमध्ये गैरप्रकारे बोगस शिक्षक भरतीची कसून चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल करा असे सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दि.21 जानेवारी 2020 रोजी शिक्षणमंत्री ना.वर्षा गायकवाड यांनी दिले.
या बाबाबत सविस्तर असे की पाचोरा – भडगाव मतदार संघांचे आमदार किशोरअप्पा पाटील यांनी बोगस शिक्षक भरती प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्या बोगस शिक्षक भरती प्रकरणी शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा कडे ही बैठक पार पडली. राज्यात अनेक शाळांनी केलेल्या अनधिकृत संचमान्यता घेऊन अनुदानित पदांमध्ये गैरप्रकारे बोगस शिक्षक केली असून या बोगस शिक्षक भरती प्रकरणी या बैठकीत चर्चा झाली.ना. वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती तरी सदर बैठकित विविध आमदार व अधिकार उपस्थित होते.