नंदुरबार ;- येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयच्या व्यवस्थापक आणि महिला लिपिकाने २५ हजारांची लाच पंचासमक्ष मागून ती न स्विकारल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत माहीत अशी कि, कनिष्ठ सहा.आदीवासी विकास महामंडळ नंदूरबार येथून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीकडुन तक्रारदार हे३० डिसेंबर २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले असून “सुधारित सेवा अंतर्गत प्रगति योजना “या योजने अंतर्गत तक्रारदार यांचे वेतनवाढ व फरकासह एकूण ११ लाख ४२ हजारांचे चे मंजूर बिल त्रुटीवर आले होते सदर त्रुटींची पूर्तता करून बिल पुन्हा मंजुरीसाठी पाठविण्यासाठी आरोपी लेखापाल. संतोष बहादूर आमटे वय 36 याने २२ मे रोजी बँकचेक च्या स्वरूपात लाच मागितली . तर लिपिक महिला आरोपी श्रीमती किरण बाळू गाढे वय 33 वर्ष हिने २५०० रुपयांची लाच रोखीच्या स्वरूपात तक्रारदार यांच्याकडे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी मागणी करून लोकसेवक पदाचा दुरुपयोग केला व नंतर लाच स्वीकारण्यास टाळाटाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक,शिरीष टी जाधव यांनी हि कारवाई केली .