Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’!

najarkaid by najarkaid
November 7, 2026
in जळगाव
0
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. ५ (प्रतिनिधी) – अंधार दूर करण्यासाठी केवळ एक दिवा पुरेसा नसतो, तर प्रत्येकाच्या आयुष्यात आशेची, विश्वासाची आणि प्रगतीची ज्योत पेटणे आवश्यक असते. कुणाच्या आयुष्यात संघर्षाचा अंधार असतो, कुणाच्या वाट्याला परिस्थितीचे चटके असतात, तर कुणी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अहोरात्र धडपडत असतो. अशा प्रत्येकाच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश पोहोचावा, या उदात्त भावनेतून जळगावच्या काव्यरत्नावली चौकात आकाशातून अवतरल्याचा भास निर्माण करणारा तब्बल ३२ फुटांचा भव्य ‘लामण दिवा’ उभारण्यात आला आहे. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून साकारलेली ही कलाकृती केवळ दीपोत्सवाची सजावट नसून, मानवी जीवनाला सात दिशांनी प्रकाशमान करण्याचा एक सुंदर विचार आहे.

भारतीय संस्कृतीत ‘दीप’ याला केवळ प्रकाशाचे साधन मानले जात नाही. तर तो ज्ञान, मांगल्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. याच परंपरेला आधुनिक कलात्मकतेची जोड देत साकारलेल्या या लामण दिव्याला सात ज्योतींचे कोंदण लाभले आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, संरक्षण आणि धार्मिक अशा जीवनाच्या सात महत्त्वपूर्ण अंगांना या ‘सप्तज्योतीं’ मधून प्रतीकात्मक स्वरूप देण्यात आले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या सातही क्षेत्रांमध्ये भरभराट व्हावी, हाच या संकल्पनेमागील मूलभूत विचार आहे.

या दिव्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ‘बंध आकाशाशी, नातं भूमीशी’ जोडणारं आहे. नाजूक दोऱ्यांमध्ये गुंफलेला हा भव्य दिवा जणू आकाशातून देवत्वाचा आशीर्वाद घेऊन पृथ्वीवर अवतरला आहे, असे दृश्य पाहणाऱ्याच्या मनात उभे राहते. त्याचा बंध आकाशाशी असला, तरी त्याचे नाते मात्र मातीशी आहे. माणसाने स्वप्ने आकाशाएवढी मोठी पाहावीत; मात्र त्या स्वप्नांना बळ मिळावे ते आपल्या मातीतून, आपल्या कष्टातून आणि आपल्या संस्कारांतून, असा अर्थही या कलाकृतीतून व्यक्त होतो.

या ‘सप्तज्योतीं’ मधील प्रत्येक ज्योत जवळपास सहा फुटांपेक्षाही मोठी आहे. मानवी अंतःकरणातील भावना, आशा, आकांक्षा आणि संवेदनशीलतेचे प्रतिबिंब या ज्योतींतून व्यक्त होते. संपूर्ण दिव्याला दिलेला सोनेरी रंग हा संपन्नता, ऐश्वर्य आणि मांगल्याचे प्रतीक ठरतो. सुमारे ८०० किलो वजनाची आणि ३२ फूट उंचीची ही भव्य कलाकृती काव्यरत्नावली चौकाच्या सौंदर्यात वेगळीच भर घालत आहे.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या लामण दिव्याची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून जैन इरिगेशनच्या कला विभागातील विजय जैन, डेव्हलपमेंट विभागातील अनिल पाटील, चंद्रशेखर विरपणकर आणि त्यांच्या २० सहकाऱ्यांनी या कलाकृतीसाठी विशेष परिश्रम घेतले. दिव्याच्या सजावटीसाठी राजेश नाईक यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

जळगावकरांचे वैभव वाढो या मंगल भावनेतू ‘लामण दिवा’ – अशोक जैन
प्रकाशाचा उत्सव साजरा करताना दुसऱ्याच्या आयुष्यातही प्रकाश निर्माण करण्याची जाणीव जागृत व्हावी, हा या लामण दिव्याचा खरा संदेश आहे. कारण दिवा स्वतः जळतो, तेव्हाच परिसर उजळतो. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाच्या आयुष्यात प्रगतीची ज्योत पेटविण्यासाठी संवेदना, सहकार्य आणि समर्पणाची गरज असते. जळगावकरांच्या जीवनात सुख, समाधान आणि सर्वांगीण वैभव नांदो, या मंगल भावनेतून काव्यरत्नावली चौकात उभारलेला हा ‘लामण दिवा’ दीपोत्सवाला एक वेगळीच वैचारिक आणि कलात्मक उंची देत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

Next Post

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

Related Posts

November 8, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Next Post
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us