Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

najarkaid by najarkaid
June 29, 2026
in जळगाव
0
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.२९ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जैन स्पोर्टस अकॅडमी च्या विद्यमाने व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड पुरस्कृत दुसऱ्या जळगाव कॅरम लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मकरा चॅलेंजर्स संघाने आप्पासाहेब लिजेंड्स संघाचा २-१ ने पराभव करून लागोपाठ दुसऱ्यांदा ह्या स्पर्धेतील विजेतेपद पटकावले. त्यांना रोख रुपये १८०००/- व चषक पारितोषिकाने गौरविण्यात आले. दुसऱ्यांदा उपविजेत्या ठरलेल्या आप्पासाहेब लेजेंड्स संघाला १२०००/- व चषकाने सन्मानित करण्यात आले.

अंतिम सामन्यातील एकेरीच्या पहिल्या सामन्यात मकरा चॅलेंजेसच्या जैद फारुकी याने आप्पासाहेब लिजेंड्स संघाच्या अभिजीत त्रिपणकरचा २२-१४, १९-२४, २५-१९ असा अतितटीच्या सामन्यात पराभव केला. एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात आप्पासाहेब लेजेंड्स संघाच्या मोहम्मद अली बागवान याने मकरा चॅलेंजर्सच्या शेख हबीब यांचा १९-१२ व १८-१० असा पराभव करून सामन्यात एक-एक ने बरोबरी करून दिली. दुहेरीच्या व निर्णायक सामन्यात मकरा चॅलेंजर्सच्या सलीम अन्सारी व मोहसीन खान या जोडीने आप्पासाहेब लिजेंड्स संघाच्या फिरोज खान व अफजल शेख यांचा ७-२५, २५-२२ व २५-११ असा पराभव करून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात स्पोर्ट्स हाऊस स्ट्राईकर्स संघाने साईनाथ टायटन्स संघाचा ३-० ने पराभव करून तिसरे क्रमांक प्राप्त केले त्यांचा रोख रुपये ७०००/- व चषक पारितोषिकाने गौरव केला.

साईनाथ टायटन्स संघाला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक रुपये ५०००/- व चषक देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात एकेरीच्या पहिल्या लढतीत स्पोर्ट्स हाऊसच्या पंकज पवार ने साईनाथ टायटन्सच्या अनिल मुंढेवर २५-७ व २५-१० असा, एकेरीच्या दुसऱ्या लढतीत स्पोर्ट्स हाऊसच्या सय्यद रिजवान ने साईनाथ टायटन्सच्या मुबशीर सय्यद चा २४-२१, १८-२५ व १८-१३ असा तसेच दुहेरीच्या सामन्यात स्पोर्ट्स हाऊसच्या सय्यद मोहसिन व अय्युब खान यांनी साईनाथ टायटन्सच्या रईस शेख व मेहमूद शेख या जोडीचा ९-१९, २०-१९ व २५-११ असा पराभव करून तिसरे क्रमांक मिळवले. साईनाथ टायटन्सला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत पंकज पवारने दोन ओपन टू फिनिश, निसार अहमदने एक ओपन टू फिनिश व एक ब्लॅक टू फिनिश तसेच जैद अहमदने एक एक ओपन टू फिनिशची नोंद केली. ओपन टू फिनिश व ब्लॅक टू फिनिश करणाऱ्या सर्व खेळाडूंना जान्हवी स्पोर्ट्स चे सागर सोपारकर यांच्यातर्फे उत्कृष्ट असे स्ट्रायकर भेट देण्यात आले.

स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मकरा चॅलेंजर्सच्या जैद फारुकी, सर्वोत्कृष्ट उदयन्मुख खेळाडू म्हणून लिसर स्पोर्ट्सच्या दानिश शेख, सर्वोत्कृष्ट गेम प्लॅनिंग करिता मकरा चॅलेंजर्सचे व्यवस्थापक सय्यद जुबेर या सर्वांना चषक आणि रोख पारितोषिके देऊन सन्मानीत करण्यात आले. फेअर प्ले अवॉर्ड चे पारितोषिक लीसर स्पोर्ट्स स्टार्स संघाने पटकावले.
अंतिम सामना संपल्यानंतर लगेच पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी सर्व संघ मालक अनुक्रमे युसुफ मकरा, अॅड. रविंद्र कुलकर्णी, अॅड. आमीर शेख, अरीश शेख, अझर खान, अशफाक शेख, श्रीउत्तम हर्बल्स, सालार किंग्स चे प्रतिनिधी तसेच कॅरम असोसिएशनचे रोहन बाहेती, मंजूर खान, आयोजकांतर्फे सैय्यद मोहसिन, शेख हबीब, शरीफ खान, फिरोज खान, अताउल्लाह खान, नासिर खान, मोहम्मद फजल आदी उपस्थित होते. गणेश लोडते यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धा समिती प्रमुख सय्यद मोहसिन यांनी आभार मानले.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, शालिग्राम राणे, रविंद्र धर्माधिकारी तसेच प्रमुख पंच.रोहित कदम, सहाय्यक पंच झोहेब खाटिक, सामन्यांचे पंच चंद्रशेखर नार्वरिया, सय्यद युसुफ, अवेस तंबोली, बिलाल शेख, यश धोंगडे, फैज शेख, हससान अन्सारी, मुबश्शीर अन्सारी यांनी काम पाहिले. स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब वर कॅरम चॅम्पियन्स लाइव्ह चॅनेलवर मुकेश इंगुलकर यांनी प्रक्षेपित केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us