9 व्या उमंग व्याख्यानमालेचा समारोप; विचारांची मेजवानी देणाऱ्या व्याख्यानमालेला श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद
चाळीसगाव – पाश्चिमात्य संस्कृती आणि विचारांच्या मागे लागलेला तरुण शिक्षणातुन संस्कार नाही तर “पॅकेज” मिळविण्यासाठी धडपड करतो आहे. समर्थ राष्ट्राच्या उभारणीसाठी पथदर्शी लोकांचा इतिहास वाचावा लागेल. हातात रिमोट आणि अँड्रॉइड मोबाईल असताना काय पाहावे, काय वाचावे याचा विचार न करता तरुण भरकटतो आहे. येत्या काळात समर्थ राष्ट्र उभरावयाचे असेल तर वॉट्सअप,इंटरनेट ,टीव्ही याच्या सॊबतीला वेद संस्कृती आध्यात्म वाचन संस्कृती जोपासावी लागेल आजच्या तरुणांनी यासाठी चळवळ उभारावी तरच समर्थ राष्ट्राच्या उभारणीची पायाभरणी होईल अशी भावना अभिनेते विचारवंत राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केली आहे ते आज गेल्या नऊ वर्षा पासून सुरू असलेल्या चाळीसगावकरांच्या मनामनातली उमंग व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशीच्या समारोपाच्या व्याख्यानात “”समर्थ राष्ट्रासाठी.. समर्थ तरुण”” या विषयांवर आपले विचार मांडताना बोलत होते.
सुरूवातीला स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव अरुण बापू निकम,गटनेते संजय पाटील, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे,के बी दादा साळुंखे, उमंग परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील, संभाजी सेनेचे लक्ष्मण बापू शिरसाठ,डॉ. हरीश दवे, प्रा. हिरामण करंकाळ,शिवसेनेचे शहर प्रमुख नगरसेवक नानाभाऊ कुमावत,नगरसेवक नितीन पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रावसाहेब कीर्तिकर,भाजप तालुकाध्यक्ष संजीव निकम, नगरसेविका विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार,नगरसेवक सुरेश स्वार,लालचंद बजाज, सदानंद चौधरी,संगीता गवळी,उमंग अध्यक्षा सुवर्णाताई राजपूत, हिरकणी महिला मंडळाच्या सुचित्रा राजपूत, जीप सदस्य भाऊसाहेब जाधव, आदर्श शिक्षक लक्ष्मण चव्हाण,ग्रामसेवक संघटनेचे संजीव निकम ऍड रणजित पाटील,प्रा किरण पाटील, संदीप जैन, अफसर खाटीक,आत्मा कमिटी अध्यक्ष रवींद्र चौधरी याचे सह मान्यवर उपस्थित होते.पाहुण्यांचा परिचय विकास शुक्ल यांनी करून दिला यावेळी सॉफ्टबॉल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविणारे धीरज सोनवणे, हर्षदिप चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला तसेच अंधशाळेतील विशेष शिक्षक सचिन सोनवणे ब्रेल लिपीतील स्वामी विवेकानंद विचार पुष्पांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले की राष्ट्र हा व्यापक संस्कृत शब्द आहे.देशाच्या29संघटना ,संरक्षणच्या तिन्ही विंग ,न्यायालय ,संसद अशा अनेकांची बोधचिन्ह ब्रीदवाक्य संस्कृत मध्ये आहेत.देशाचा आत्मा वेद,संस्कृती आध्यात्मावर आधारित असतांना इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे संस्कृत हद्दपार झाले परिणामी मूल्याधिष्ठित शिक्षण दूर गेले.उदाहरण द्यायचे झालेच तर पवित्र विवाह पद्धतीत आम्ही सॊबत राहून बघितले आमचे जमण्यासारखे नाही म्हणून घटस्फोट देणारे तरुण राष्ट्राच्या समाज व्यवस्थेशी कसे जुळवून घेतील असा सवाल त्यांनी उपस्थित करून आजच्या तरूणांना स्वदेश स्वधर्म स्वभाषा समजून घेण्याचे आवाहन केले.
बालशिवाजी यांच्या वरील परमानंद यांनी लिहलेला ग्रंथ, समर्थ रामदास,वीर सावरकर, भगतसिंग सुखदेव राजगुरू,भारतरत्नविश्वसरेय्या यासह अनेक दाखले देऊन, राष्ट्रभक्तीचे किस्से सांगून त्यांनी राष्ट्राच्या मातीशी एकरूप होण्याचे आवाहन केले. चारचौघे एकत्र आले तर सर्वांची ख्याली खुशाली विचारताना आई घरकाम करते असे अनेक जण कुत्सित पणे बोलतात मात्र आपला पहिला गुरू असलेली आई आहे त्या बजेट मध्ये घर चालविते ज्याला जे लागेल त्याची काळजी घेते.ती खरी मॅनेजमेंट गुरु असून राष्ट्राच्या उभारणीत सर्वात मोठा सहभाग आईचा ठरतो आहे मात्र आजच्या संस्कृतीत आई ची जागा मम्मीने घेतली असून मदर्स डे साजरा करणाऱ्या घाणेरड्या संस्कृती मुळे संस्कार हद्दपार होत आहे या करिता संस्काराचा इतिहास पुन्हा तरुणांनी वाचून काढावा तरच ते समर्थ राष्ट्रासाठी समर्थ तरुण ठरेल. यासाठी वाचन संस्कृती चळवळ घराघरांपर्यंत न्यावी.अशी अपेक्षा करीत अमावस्येला लिंबू मिरचीचा आधार घेणाऱ्याच्या मानसिकतेची चिरफाड त्यांनी केली. खासदार उन्मेश दादा पाटील मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत उपस्थित रसिक मायबाप श्रोत्यांचे आभार मानले. यशस्वीतेसाठी राजेश ठोबरे,प्रशांत वाघ,अजय जोशी योगेश चौधरी,फैयाझ शेख, सुनील रणदिवे,गणेश काळे ,विनायक वाघ, संमकीत छाजेड, सचिन पवार, आशुतोष खैरनार ,संजय पवार ,हिमांशू ब-हाटे, सुभाष ठाकरे, अनिल शिंदे,अमोल नानकर एड प्रशांत पालवे,भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सर्वश्री कपिल पाटील, अक्षय मराठे, हर्षल चौधरी, कैलास गावडे,योगेश गव्हाणे, बबडी शेख, राहुल पाटील, शुभम पाटील ,सोनू आहिरे, भोजराज खैरे, किशोर रणधीर, शिवराज पाटील, पप्पू राजपूत, भूषण साळुंखे, विकी देशमुख,तुषार जगताप, शुभम पाटील, तालुका विस्तारक गिरीश ब-हाटे ,अजय वाणी, भूषण साळुंखे ,भरत गोरे,बंडू पगार, अमित सुराणा, सचिन पाटील, धर्मराज पवार, गणेश महाले ,पंकज वाणी,आदी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन गोरख वाघ केले .श्रोते लकी ड्रॉ मध्ये दिलीप कोठावदे हे भाग्यवान श्रोते ठरले. व्याख्यानमालेच्या समारोपाला हजारोंच्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आपल्या आवाजाच्या चढउताराने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.














