जामनेर ;- धुळे तालुका पोलीस स्टेशनला दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला जामनेर पोलिसांनी आज अटक केली .
याबाबत माहिती अशी कि, २४ जून रोजी रात्री डिड वाजेच्या सुमारास म्हशी खरेदी विक्री करणाराने व्यापारी सलीम खान लागोदर खान वय ३८ रा. बंदीफरिया ता. महुआ जिल्हा सुरत हे ५ म्हैस , ३ पारड्या , व १ पारडा असे सुरत येथून खरेदी करून धुळे येथे घेऊन येत असताना आरोपी कैलास बाबुलाल चव्हाण वय ३४ रा. वरखेडे ता. चाळीसगाव व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादी आणि त्याच्या साक्षीदारांना जबर मारहाण करून म्हशी आणि रोख रक्कम , मोबाईल असा एकूण ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता . आरोपी कैलास चव्हाण हा गारखेडा ता. जामनेर येथे लपून बसल्याचा माहितीवरून जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वाखाली गारखेडा गवत उपनिरीक्षक सुनील कदम,पोना किशोर परदेशी योगेश महाजन,प्रकाश चिंचोरे , राहुल पाटील , हंसराज वाघ यांच्या पथकाने सापळा रचून अटक करून धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.