जळगाव | नजरकैद न्यूज – जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ६ ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे उमेदवार किरण लक्ष्मण राजपूत यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला असून, ते थेट होम टू होम भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांशी थेट संपर्क ठेवणारे किरण राजपूत हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, सामान्य कुटुंबातून पुढे आलेला असामान्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रभागात ओळख आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना किरण राजपूत म्हणाले की, “मी विकासाची फक्त आश्वासने देत नाही, तर विकासाचे वचन देतो. प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, युवक व महिलांसाठी संधी निर्माण करणे हे माझे प्राधान्य राहील.”
होम टू होम प्रचाराच्या माध्यमातून ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संधी देण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या या थेट संवादामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळत असून, निवडणूक प्रचाराला वेग आला आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. ६ ड मध्ये किरण राजपूत यांची ही सक्रिय आणि लोकाभिमुख प्रचारशैली चर्चेचा विषय ठरत आहे.














