जळगावात उद्यापासून अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन
फवारणी ड्रोन, कृषी यंत्र – अवजारे प्रमुख आकर्षण
जळगाव (प्रतिनिधी) – कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या 11 वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्या अॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात नवतंत्रज्ञान, हायटेक फार्मिंग शेतमजुरीला पर्याय ठरतील, असे ड्रोन व लहान-मोठे शेती यंत्र व औजारांवर भर दिला आहे. या आधुनिक कृषी प्रदर्शनाचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
अॅग्रोवर्ल्डच्या या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात 210 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत. शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा लहान मोठ्या कृषी यंत्र व औजारांचे तब्बल 45 स्टॉल्स आहेत. बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती, कमी पाण्यात येणारी पिके अशा शेतकर्यांची मागणी व गरजेवर आधारित मांडणी हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. अॅग्रोवर्ल्डचे जळगावतील यंदाचे हे 11 वे प्रदर्शन आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड, अँग्रिसर्च इं. प्रा.लि., मेट्रोजेन बायोटेक प्रा. लि या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषीतंत्र, निर्मल सिड्स, नमो बायोप्लांटस, सातपुडा अँटोमोबाईल्स, श्रीराम ठिबक, राईज एन शाईन बायोटेक प्रा लि, कृषिदूत बायो हर्बल, ओम गायत्री नर्सरी, युनिटी एनर्जी प्रा लि, पॅक युनिव्हर्स, महाविरा झेरॉन, फायटोट्रॉन, गोदावरी फाऊंडेशन हे सहप्रायोजक आहेत.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
शेतमजूर समस्येच्या पर्यायावर भर, विविध पिकांतील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, हाय व्हील्स चाकासह कृषी यंत्र व औजारांचे उपयुक्त स्टॉल्स, शेती बरोबरच परसबाग / टेरेस गार्डन साठीची रोप (नर्सरी ), फळे व भाजीपसल्याच्या नर्सरी, सोलर फार्मिंग, झटका मशीन, फवारणसाठी ड्रोन, बँक, शासकीय विभाग व अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती उपलब्ध असेल. टिशूकल्चर केळीच्या कंपन्या, किचन गार्डन टूल्स, कमी पाण्यात, कमी श्रमात व हमीचे उत्पन्न देणारे अद्ययावत तंत्रज्ञान सखोल मार्गदर्शन, कमी श्रमात – कमी पाण्यात मात्र शाश्वत उत्पादन देणार्या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली असणार आहेत. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील.
निर्मलतर्फे मोफत बियाणे
निर्मल सिडसतर्फे पहिल्याच दिवशी पहिल्या पाच हजार जणांना किचन गार्डन बियाणे पाकीट मोफत वितरित केले जाणार आहे. याव्यतिरिक्त रोज शंभरपेक्षाही अधिक जणांना लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षीसांसह सिका ई- मोटर्सतर्फे ई-स्कूटरचे बंपर बक्षीस जिंकण्याची संधी आहे. तरी शेतकर्यांनी या आधुनिक कृषी यंत्र व अवजारे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








