लोणवाडी, ता. जळगाव (प्रतिनिधी): लोणवाडी ग्रामपंचायतीतील घरकुल यादीतून पात्र लाभार्थ्याचे नाव वगळल्याच्या प्रकरणात अजून धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून ‘त्या’ ठरावावर ७ सदस्यांनी थेट आक्षेप घेत सरपंच-ग्रामसेवक यांनी परस्पर ठराव केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती जळगाव यांना तक्रार दिली असून ‘तो’ रद्द करून सरपंच ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यामुळे सरपंच, ग्रामसेवक अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान ग्रामपंचायत सदस्य संदीप भास्कर पवार,साईदास राठोड,व इतर सदस्य यांच्याशी ‘नजरकैद’ प्रतिनिधी यांनी मोबाईलवर संपर्क साधून या तक्रारी बाबत विचारणा केली असता होय आम्हीच तक्रार केली असून लोणवाडी येथील कमलाबाई शिवाजी चव्हाण यांचे नाव पंतप्रधान आवास योजना (PMAY) योजनेच्या लाभार्थी यादीतून नाव वगळण्यासाठी करण्यात आलेला ठराव आम्हाला विश्वासात न घेता परस्पर करण्यात आलेला आहे. तरी सदर ठराव सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परस्पर केला अशी माहिती त्यांनी दिली आहे. सदर प्रकरणाने आधीच खळबळ उडाली असतांना या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्यांनी नवा खुलासा केल्याने प्रकरणाने नवं वळण घेतलं असून गटविकास अधिकारी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
लोणवाडी येथील कमलाबाई शिवाजी चव्हाण यांचे नाव पंतप्रधान आवास योजना (PMAY) अंतर्गत ऑफलाईन यादीत क्रमांक ४१ वर होते. मात्र ऑनलाईन यादीत त्यांचे नाव अचानक गायब झाले. यासंदर्भात ग्रामसेवकांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नाव जाणूनबुजून वगळले असल्याचा संशय लाभार्थ्यांच्या मुलगा अॅड. अरुण चव्हाण यांनी व्यक्त केला.

माहिती अधिकारात माहिती उघड ; ठरावात खाडाखोड?
अॅड. अरुण चव्हाण यांनी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत पंचायत समितीकडून माहिती मागवली असता धक्कादायक बाब समोर आली. जानेवारी महिन्यातील ठराव क्रमांक 8/1 मध्ये 30 नावे घरकुल यादीतून वगळल्याचे नमूद होते. मात्र, अनुक्रमांक 31 आणि 32 अशी दोन नावे नंतर लहान अक्षरात वाढवण्यात आली होती. परिणामी कमलाबाई चव्हाण यांचे नाव गायब झाले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
लोणवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच व इतर सदस्यांना विश्वासात न घेता, सरपंच आणि ग्रामसेवकांनीच ठराव केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जळगाव यांच्याकडे दिनांक ४ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर ७ सदस्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे ग्रामसेवक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तक्रार अर्जावर या सदस्यांच्या सह्या
1) साईदास राठोड
2)संदीप भास्कर पवार
3)मंगला रमेश पाटिल
4)श्रावण सदू राठोड
5)वैताबाई रोहिदास चव्हाण
6)आशाबाई रमेश ठाकरे
7)गीता बाळू धाडी
पोलिस अधीक्षकांकडे थेट तक्रार
या संपूर्ण प्रकरणात सरकारी दस्तऐवजांमध्ये खाडाखोड केल्याचा आरोप करत अॅड. अरुण चव्हाण यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. यात ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण, सरपंच अनिता बळीराम धाडी आणि त्यांचे पती बळीराम धाडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पैशांची मागणी व धमकीचा आरोप
कमलाबाई चव्हाण यांनी सन 2005 पासून शासकीय जागेत वास्तव्य केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत अर्ज करताना त्यांचे नाव पात्रतेनुसार समाविष्ट झाले होते. मात्र, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी पैसे मागितले, अन्यथा घरकुल मिळणार नाही, अशी धमकी दिल्याचेही पत्रात नमूद आहे.
पावसाळ्यात धोक्यात कच्चे घर
सध्या पावसाळा सुरू असून, कमलाबाई चव्हाण यांचे मातीचे घर धोक्यात आहे. त्यामुळे त्यांचा जीव आणि मालमत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी अरुण चव्हाण यांनी केली आहे.
Latest news :
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?
तुमचा क्रेडिट स्कोर लो आहे का? पर्सनल लोन मिळवण्यासाठी या 6 ट्रिक्स ठरतील उपयोगी!
SIP मध्ये होणाऱ्या गुंतवणूक करतांना या ५ चुका टाळा,अन्यथा…
US Visa Interview Waiver बंद : भारतीय विदयार्थ्यांवर थेट परिणाम,अमेरिकेने घेतला मोठा निर्णय!
महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?
महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
हे पण वाचा :- Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
हे पण वाचा :- Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!










