जळगांव – आज स्व.जनार्दन सुका खडके स्मरणार्थ जळगाव शहर आंतर शालेय लंगडी जिल्हास्तरीय स्पर्धा वय ९ ते १० वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी भरवण्यात आल्या होत्या. त्यात श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आव्हाणे शिवार जळगाव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले, मुला व मुलींच्या दोघी संघाने प्रथम क्रमांक मिळवला. त्यात उत्कृष्ट धावपटू म्हणून तेजस ईश्वर सोनवणे या विद्यार्थ्यांनी ३२ संघा मधून प्रथम क्रमांक पटकावला व मुलींच्या गटातून निलिमा सागर जाधव हीने देखील ३२ संघा मधून प्रथम क्रमांक पटकावला.
मुलांमधून द्वितीय क्रमांक सिध्दिविनायक प्राथमिक विद्यामंदिर जळगाव तर उत्तेजनार्थ र का भोळे प्राथमिक विद्या मंदिर यांनी मिळवला. तसेच मुलीं मधून द्वितीय सिध्दिविनायक प्राथमिक विद्यामंदीर जळगाव व उत्तेजनार्थ विद्या विकास प्राथमिक विद्यामंदिर यांनी पटकावला. या स्पर्धेला क्रिडा अधिकारी मा. एम के पाटील प्रमुख म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्यध्यपिक हर्षाली पाटील,वैशाली शिंदे,सद्दाम तडवी,महेंद्र साळुंखे यांचे सहकार्य लाभले. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.