
कौन्सिलने जीएसटीचे फक्त दोन स्लॅब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे – ५ टक्के आणि १८ टक्के. याशिवाय, अनेक जीवनावश्यक वस्तूंना थेट करमुक्त करण्यात आले आहे.
‘या’ वस्तू आता शून्य जीएसटी अंतर्गत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले की, अनेक अन्नपदार्थ आता पूर्णपणे करमुक्त झाले आहेत.
रेडी टू इट रोटी
रेडी टू इट पराठा
सर्व प्रकारची ब्रेड
पिझ्झा
कॉटेज चीज (पनीर)
यूएचटी दूध
छेना
आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे मोठे निर्णय
शिक्षणाशी संबंधित वस्तूंवरही सूट
विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देत सरकारने शिक्षणाशी निगडित वस्तूंवरील कर पूर्णपणे रद्द केला आहे.
पेन्सिल
खोडरबर (इरेजर)
कटर
नोटबुक
ग्लोब
नकाशा
प्रॅक्टिस बुक
ग्राफ बुक
औषधे आणि आरोग्य क्षेत्रासाठी मोठा फायदा
सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत ३३ जीवनरक्षक औषधांवरील जीएसटी रद्द करण्यात आला आहे. यापूर्वी यावर १२% कर होता. तसेच, आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीही जीएसटीमुक्त करण्यात आल्या आहेत.
करदरात मोठी कपात
ट्रॅक्टरचे काही भाग : १८% वरून ५%
दूधाच्या बाटल्या, स्वयंपाकघरातील भांडी, छत्री, सायकली, बांबूचे फर्निचर, कंगवा : १२% वरून ५%
शॅम्पू, टॅल्कम पावडर, टूथपेस्ट, टूथब्रश, फेस पावडर, साबण, केसांचे तेल : १८% वरून ५%
या निर्णयांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त दरात मिळतील आणि महागाईचा ताण काही प्रमाणात कमी होईल, असा सरकारचा दावा आहे.
या बदलांचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त झाल्याने सामान्य कुटुंबाचा खर्च काही प्रमाणात कमी होईल. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसंबंधित साहित्य स्वस्त मिळेल, तर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य स्वस्त होणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील दोन्ही स्तरावर दिलासा मिळेल.
यासोबतच, कर रचनेतील साधेपणा हा मोठा टप्पा मानला जात आहे. आतापर्यंतच्या अनेक जीएसटी स्लॅबमुळे गोंधळ निर्माण होत होता, मात्र आता फक्त दोन दरांमध्ये वस्तूंचे वर्गीकरण झाल्याने व्यापाऱ्यांनाही फायदा होणार आहे. यामुळे व्यापार सुलभ होईल आणि करचुकवेगिरीवरही आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?
महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
हे पण वाचा :- Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
हे पण वाचा :- Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
BSF सीमा सुरक्षा दलात 1012 हेड कॉन्स्टेबल पदांची भरती : 12 पास लगेच अर्ज करा !
5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!
बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी