Maharashtra Drug Awareness Campaign, Anti-Drug Public Participation महाराष्ट्रात अंमली पदार्थ विरोधात आता सामान्य नागरिकही ‘इन्स्पेक्टर’ म्हणून कारवाईत सहभागी होणार आहेत. शासनाच्या नवीन मोहिमेअंतर्गत ड्रग्ज विकणाऱ्यांवर बडतर्फ कारवाई होणार.Maharashtra Drug Awareness Campaign, Anti-Drug Public Participation

लोक बनणार ‘इन्स्पेक्टर’, ड्रग्ज विकणाऱ्यांवर नजर
पोलिसांच्या सहकार्याने नागरिकांना सहभागाची संधी
प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विक्री बंद
आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटवर कडक कारवाई
Maharashtra Drug Awareness Campaign, Anti-Drug Public Participation
मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील अंमली पदार्थांचा वाढता प्रसार पाहता, महाराष्ट्र शासनाने “लोक इन्स्पेक्टर” ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत, सामान्य नागरिकही पोलिसांच्या मदतीने अंमली पदार्थ विक्रेत्यांवर नजर ठेवू शकतील आणि माहिती देऊन थेट कारवाईत सहभागी होऊ शकतील.Maharashtra Drug Awareness Campaign, Anti-Drug Public Participation हे मिशन संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि तरुणांमध्ये जागरूकता वाढवून अंमली पदार्थ विक्रीला आळा घालण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कठोर कारवाईचे निर्देश:
राज्य गुप्तचर विभाग, अंमली विरोधी पथक, स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा यांचा समन्वय साधून ड्रग्ज विक्रेत्यांवर बडतर्फ कारवाई केली जाणार आहे. रेकॉर्डवरील अपराध्यांवर लक्ष ठेवले जाईल.Maharashtra Drug Awareness Campaign, Anti-Drug Public Participation
प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विक्री बंद:
ड्रग्जसदृश प्रभाव देणाऱ्या औषधांच्या विक्रीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विक्रीस बंदी घालण्यात आली असून, औषध विक्रेत्यांवर देखील नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
काय आहे शासनाचे उद्दिष्ट:
नागरिकांचा सक्रिय सहभाग घेत तरुणांमध्ये जागरूकता आणणे यामागचा प्रमुख उद्देश आहे.अंमली पदार्थांचे मूळ उखडणे आणि आंतरराज्यीय टोळ्यांचा छडा लावणे.यासाठी शासनाने भूमिका स्पष्ट केली असून याकरिता नागरिकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
जनतेला आवाहन:
राज्य सरकारने जनतेला आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वर्तन किंवा विक्री दिसल्यास पोलिसांना त्वरित कळवावे. माहिती देणाऱ्याची गोपनीयता राखली जाणार आहे.Maharashtra Drug Awareness Campaign, Anti-Drug Public Participation