जळगाव– समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणा-या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात देण्यात येणा-या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता काही अटींची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे. तसेच पुरस्कारासाठी दि.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशी गणना विचारात घेण्यात येणार आहे. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहित केलेल्या अटीची पूर्तत करणे आवश्यक राहणार आहे.
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार
२. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार
३. पदमश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार
४. संत रविदास पुरस्कार
५. शाहू, फुले व आंबेडकर पुरस्कार
६. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी २०२५ अखेर सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगाव या कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत अर्ज करण्यात यावेत असे आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.