जळगांव : जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील तरसोद ते पाळधी या मार्गासाठी ०३ फेब्रुवारी २०२५ पासून अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आली आहे.
नागरिक या मार्गावरील कोणत्याही रस्ते अपघातासाठी १०३३ क्रमांकावर डायल करून ही सुविधा मोफत घेऊ शकतात. ही सुविधा २४/७ उपलब्ध राहणार आहे.
अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अॅम्ब्युलन्सचा वाहन क्रमांक TO125UPS99SA हा आहे. तर पर्यवेक्षकांचे नाव अमोल गोरे असून त्यांचा मो.क्र. ९०२८०९८८८३ हा आहे.
ही रुग्णवाहिका जळगाव शहरात तैनात करण्यात आली आहे आणि ती कार्यान्वित झाल्यानंतर जळगाव बायपास येथे हलवली जाणार आहे. ही रुग्णवाहिका पीआययू-जळगाव कार्यालयाजवळ असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी शिवाजी पवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.