सेवानिवृत्त शिक्षकांचा केला सत्कार
वरणगांव – थोरगव्हाण येथील डी एस देशमुख हायस्कूलच्या १९९५ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बॅचचा आपल्याला शिकवणाऱ्या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व मेळावा दिनांक २८ डिसेंबर रोजी थोरगव्हाण येथील डी एस डी विद्यालयात संपन्न झाला
.तब्बल पंचवीस वर्षानंतर त्या वेळचे सर्व विद्यार्थी शाळेत एकत्र आले होते.शिक्षक व विद्यार्थी यांची ही अतिशय हृदयस्पर्शी व मनाला मिळणारी भेट तब्बल २५ वर्षानंतर झाली होती.सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी आपण दहावीला या वर्गामध्ये बसायचे तिथे वर्ग भेट घेतली काही सेवानिवृत्त शिक्षक बोरोलेसर , एस एस पाटील सर यांनी एक तास घेतला.विद्यार्थी आपल्या पंचवीस वर्षांपूर्वीचा आठवणींमध्ये रमून गेले प्रत्येकाचे डोळे पाणावले. नंतर सेवानिवृत्त सर्व शिक्षकांचा तसेच मयत झालेलया शिक्षकांच्या परिवाराचा , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा श्रीफळ ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री आर आर पाटील तथा संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष व शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री आर पी चौधरी सर उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाला इतर मान्यवर म्हणून श्री सुरेश पाटील शालेय समिती सदस्य श्री रजनीताई पाटील शालेय समिती सदस्य शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष श्री राजेश शिंदे थोरगव्हाण गावचे पोलीस पाटील श्री अरविंद झोपे , सरपंच श्री सचिन भिल , मुख्याध्यापक श्री एस एस. वैष्णव सर उपस्थित होते.
.सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करताना प्रत्येक जण भारावून गेला होता आपल्या आवडत्या शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थी चरणस्पर्श करून अभिवादन करत होते अतिशय भावनिक हा सोहळा होता व सूत्रसंचालन करताना श्री संतोष राणे यांनी प्रत्येक शिक्षकाचे अगदी चपखल शब्दांमध्ये वर्णन केले त्यामुळे त्या शिक्षकाच्या गत आठवणींना सुद्धा उजाळा मिळत होता कार्यक्रमानंतर स्नेहभोजना चा आस्वाद सुद्धा घेण्यात आला जवळपास पूर्ण दिवस माजी विद्यार्थी आपल्या तत्कालीन शिक्षकांसोबत शाळेतच होते.शेवटी निरोप घेताना शिक्षकांची व विद्यार्थ्यांचे डोळे भरून आले आपल्या सेवानिवृत्त शिक्षकांना निरोगी आयुष्याची शुभकामना देऊन प्रत्येकांनी एकमेकांचा निरोप घेतला प्रत्येकाने निघताना आपल्या शाळेला पुन्हा एकदा वाकून नमस्कार केला. असा हा गुरु शिष्य परंपरा जपणारा अतिशय संस्मरणीय सोहळा शाळेच्या मैदानात पार पडला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष राणे व ललीता पाटील यांनी केले आभार पोलीस पाटील . अरविंद झोपे यांनी मानले , कार्यक्रम यशस्वीतेसाठी भास्कर पाटील , आशिष पाटील , संतोष झोपे , सचिन चौधरी , सचिन नाले . राहुल पाटील , भूषण , विजय , सारंग दिपक , विनोद , प्रविण , पदम राज , सतिष , महेश , धिरज , संजय , भरत, नंदकिशोर , लिना शिंदे , वर्षा लोणे , जयश्री , दिपाली , शितल चौधरी , प्रतिभा , आरती , आशा , वैशाली , वंदना , सुर्वणा , माधुरी आदी माजी विदयार्थी व विदयार्थीनी नी परिश्रम घेतले