जळगाव, प्रतिनिधी – जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनतर्फे २३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते ही स्पर्धा सुहाना टेन सर्किट यांनी प्रायोजित केली होती. जळगाव येथे झालेल्या स्पर्धेत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, संभाजीनगर, धुळे, नागपूर, अमरावती व जळगाव येथील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. यात पुण्याचा आरुष देशपांडे विजयी झाला तर जळगावचा इवान जैन हा उपविजेता ठरला. मुलींमध्ये सांगलीची भार्गवी भोसले ही विजेती तर धुळ्याची निधी पाटील ही उपविजयी झाली. महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचा आज उपपोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक प्रवीण गायसमुद्रे, जळगाव जिल्हा लॉन टेनिसचे अध्यक्ष रमेशदादा जैन, सदस्य प्रवीण पटेल, राधेश्याम सोनवणे, स्पर्धा संचालक कृपालसिंह ठाकूर, अरविंद देशपांडे हे उपस्थित होते. पोलीस उपाधीक्षक संदीप गावीत यांनी या स्पर्धा जळगाव येथे आयोजित केल्या याबाबत असोसिएशनचे अभिनंदन केले व पोलीस मैदानावरील या टेनिस कोर्ट वर अशाच प्रकारच्या स्पर्धा भविष्यात आयोजित केल्यास पोलीस विभाग त्यास संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासित केले.
काल झालेल्या स्पर्धेतून मुलींमध्ये निधी पाटील धुळे विजयी विरुद्ध हर्दिनी त्रिभुवन यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला व निधी पाटील ६-२ असा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला तर दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामन्यात सांगलीच्या भार्गवी भोसले तिने जळगावच्या आरूध्या नाथानी तिच्यावर ६-१ असा विजय नोंदवून अंतिम फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या अंतिम फेरीत भार्गवी भोसले तिने धुळ्याच्या निधी पाटील वर ६-१ असा विजय मिळवला अंतिम सामना जिंकून विजयी करंडकावर आपले नाव कोरले. मुलांच्या उपांत्य फेरीत आरुष देशपांडे याने दोहाद कसले याच्यावर ६-२ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला तर तर दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात जळगावच्या ईवांन जैन याने आदित्य उपाध्ये याच्यावर ६-४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अतितटीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या आरुष देशपांडे याने इवान जैन याच्यावर ४-१ व ५-४ (टायब्रेक ७-३) असा विजय मिळवत विजयी ट्रॉफी आपल्या नावे केली.
या स्पर्धेत तीर्थ पटेल, यश पाटील, हर्षित पटेल, घनश्याम कोळी, देव ठाकूर, सनय नाथानी, प्रतीक हरीमकर व जिनीशा मंधान यांनी पंच म्हणून काम पाहिले. यशस्वीतेसाठी पवन पाटील, विनय मिश्रा, प्रकाश दांडेकर, राहुल चौधरी, महादेव पळासकर, तनवीर पठाण, सुभाष घोडेस्वार यांनी तसेच पोलीस विभागातील सहकाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन आफ्रिन खान हिने केले. आभार रमेशदादा जैन यांनी मानले.