Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले -मत माजी नगराध्यक्ष संजय गोहिल

najarkaid live by najarkaid live
November 14, 2024
in Uncategorized
0
पाचोरा शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले -मत माजी नगराध्यक्ष संजय गोहिल
ADVERTISEMENT
Spread the love

पाचोरा ता.4: पाचोरा शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आमदार किशोर पाटील म्हणजे विकास असे जुणू समीकरण असल्याचे मत माजी नगराध्यक्ष संजय गोहिल 1aयांनी व्यक्त केले आहे. पाचोरा शहर हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात गतीने विकसित होणारे शहर बनले असून ते विकासाचे एक मॉडेल ठरेल असा दृष्टिकोन समोर ठेवून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या दूरदृष्टीने आम्ही शहराला देखणी रूप देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माजी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी सांगितले.
शहरातील रस्ते DPR साठी १४६ कोटी
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विस्तारणारे शहर म्हणून पाचोरा शहराची ओळख निर्माण झाली आहे
नगरपरिषद हद्दीतील व नव्याने विस्तारलेल्या शहरातील कॉलनी व वस्ती भागातील रस्त्यांची काँक्रिटीकरण करण्यासाठी पाचोरा नगर परिषदेच्या माध्यमातून दोन टप्प्यात निधी मंजूर करण्यात आला यात पहिल्या टप्प्यातील 42 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून नुकताच पुन्हा 104 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून या कामांना देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे फक्त शहर हद्दीतील कॉलनी भागातील रस्त्यांसाठी तब्बल एकूण 146 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या कामामुळे शहराला नवीन आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे.
स्व. आर ओ तात्यासाहेब
पायाभूत सुविधा सोबतच शहरातील व्यापार वृद्धीसाठी व व्यापार करणाऱ्या उद्योजक व व्यापारी बांधवांसाठी हक्काची जागा असावी या भावनेतून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून पाच कोटी रुपये खर्चाचे स्वर्गीय तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या नावाने भव्य व्यापारी भवन उभारले असून यामुळे व्यापारी बांधवांची वर्षानुवर्ष असलेली मागणी पूर्णत्वास नेऊन व्यापारी बांधवांच्या सुख सोयीसह शहराच्या सौंदर्यकरणात देखील या टुमदार इमारतीने भर घातला आहे.
पाचोरा शहरातील हिवरा नदीवरील उपयुक्त पुलांची निर्मिती
पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या हिवरा नदीवरील अतिशय कमी उंचीच्या जून्या पुलामुळे पावसाळ्यात पाचोरा शहर आणि कृष्णापुरीकडील भागाचा संपर्क सतत तुटलेला असायचा. दळणवळण व व्यापारावर याचा गंभीर परिणाम होत असे.हिवरा नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यात अनेक नागरिक वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटना उघड्या डोळ्यांनी पहाव्या लागत होत्या.दूरदर्शी नेता असलेल्या आमदार किशोर आप्पा पाटील यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली.शासन दरबारी सतत पाठपुरावा करून तब्बल 20 कोटी रुपये निधीतून कृष्णापुरीचा पूल, पांचाळेश्वर पूल तसेच स्मशानभूमी शेजारील पूल अशा तब्बल तीन पुलांची निर्मिती करण्यात आली.या कामामुळे मोलाचे विकास कार्य पूर्ण झाले असून शहराच्या सौंदर्यात देखील भर पडली आहे.यामुळे नागरिकांची वाहनधारकांची व व्यापाऱ्यांची मोठी सोय झाली आहे. नागरिकांचा वेळ आणि मोठा फेरा देखील टळला आहे..
पाचोरा शहरातील सुसज्ज व्यापारी संकुल आणि भाजी मंडईची निर्मिती
पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पूर्वी असलेल्या भाजी मंडई च्या परिसरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरलेले होते.पावसाळ्यात तर भाजी बाजारात चालने सुध्दा अवघड होते.हार्ट ऑफ सिटी असलेल्या भागाला गटाराचे स्वरूप आले होते.कर्तव्यदक्ष आमदार किशोर आप्पा यांनी या भागाचा विकास आराखडा बनवला आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारे कै.बापूसाहेब के एम पाटील व्यापारी संकुल प्रत्यक्षात आकाराला आले आहे.या भव्य आणि दिमाखदार व्यापारी संकुलाच्या ग्राउंड फ्लोअरला भाजी मंडई निर्माण करण्यात आली असून त्यामुळे भाजीपाला विक्रेत्या व्यापारी बांधवांचे ऊन वाऱ्यापासून संरक्षण झाले असून त्यांच्या भाजीपाला विक्री व्यवसायाची कायम स्वरुपी सोय झाली आहे.यामुळे शहरातील रहदारी सुरळीत झाली असून अतिक्रमणाचा विषय देखील मार्गी लागला आहे.
वारकरी भवन
पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तीचा वारसा लाभलेल्या घरण्यातून आलेल्या आप्पासाहेबांनी मतदार संघाचा चौफेर विकास साधत असतानाच अध्यात्मिक सेवा करणाऱ्या कीर्तनकार भजनी मंडळातील साधकांच्या सेवेसाठी तब्बल 5 कोटी रुपये खर्चाचे वारकरी भवन मंजुर केले आहे. लवकरच त्याचे काम सुरू होणार असून या माध्यमातून वारकरी संप्रदायातील भाविकांची सेवा आमदार किशोर आप्पा यांच्या माध्यमातून घडणार असल्याने ते एक सेव व्रती म्हणून समोर आले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय
आरोग्यदूत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांतून मतदार संघातील जनतेसाठी सुमारे १७ कोटी रुपये खर्चाचे उपजिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ग्रामीण रुग्णालयाचे आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर होणार आहे. सुसज्ज अशा उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व फॅकल्टीजचे डॉक्टर असणार आहेत. येत्या काळात पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या रुग्णांना जळगाव,धुळे, छत्रपती संभाजी नगर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सर्व सुविधायुक्त आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार असून याचा गरजू रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.
श्रीराम मंदिर परिसराच्या विकासामुळे पाचोरा शहराचे रूपड पालटणार…

पाचोरा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा
पाटील यांच्या पाठपुरामुळे पाचोरा शहरातील सुमारे साडेतीनशे वर्षांचा प्राचीन इतिहास असलेल्या साधू परंपरेतील श्रीराम मंदिर परीसराचा वैशिष्ठ्यपूर्ण योजनेतून पर्यटन विकासासाठी 12 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झाली आहे यामुळे पाचोरा शहराच्या पर्यटन वृद्धीला नवचालना मिळणार आहे. पहिल्या टप्प्याच्या कामात प्रामुख्याने लँडस्केपिंग, आरसीसी कुंपण, लगतची बुरुज, काँक्रीटची रस्ते, पार्किंग एरियाचे काँक्रिटीकरण, सुमारे 500 जणांची बैठक क्षमतेचे ओपन एअर mp थिएटर, ड्रेनेज,शौचालय आदी कामे सुरू आहेत. या कामामुळे शहराची जिल्ह्यात एक आगळीवेगळी ओळख निर्माण होणार आहेच पण शहर सौंदर्यकरनात मोठी भर पडणार आहे.
काकनबर्डी टेकडीचा विकास
विकासपुरूष आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांतून सुमारे ५ कोटी रुपये खर्चून काकनबर्डी परिसराचा विकास करण्याचे काम सुरू आहे. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेल्या या टेकडीवर वाहन घेऊन जाणे हेच खूप मोठे आव्हान होते परंतु मा. किशोर आप्पांच्या प्रयत्नांमुळे येथे रस्ता,घाट, सेल्फी पॉइंट तसेच येणाऱ्या भाविकांसाठी सभा मंडप ही बांधण्यात येणार आहे. यामुळे शहरातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे.
ओपन स्पेशल निर्मितीने शहरवासीयांची झाली सोय
पाचोरा शहरात सुमारे अडीचशे ओपन स्पेस ची निर्मिती करत कॉलनी वाशी यांची सोय करून दिली आहे या ठिकाणी होणारे लहान मोठे कार्यक्रमांमुळे जनतेत समाधानाचे वातावरण असते त्यामुळे कॉलनी परिसरात एक उपाय लागला आहे यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सुमारे 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

Next Post

रावेर-यावल विधानसभा ; काँगेसचे उमेदवार धंनजय चौधरींच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
रावेर-यावल विधानसभा ; काँगेसचे उमेदवार धंनजय चौधरींच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद

रावेर-यावल विधानसभा ; काँगेसचे उमेदवार धंनजय चौधरींच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद

ताज्या बातम्या

Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Load More
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us