वावडदा, ता.जळगाव (सुमित पाटील)- तालुक्यातील वावडदे परिसरातील कुलस्वामीनी आई भवानी मंदिराला तीर्थक्षेत्र क चा दर्जा राज्य शासनाने दिला आहे.वावडदे ता जि जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब रविंद्र कापडणे यांनी नामदार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून शासनाकडे भवानी मंदिराला तीर्थक्षेत्र क चा दर्जा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला होता.दरम्यान पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.