Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मणक्याच्या (स्पाईन) आजाराच्या दुर्धर व महागड्या शस्त्रक्रीया मोफत

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष वैद्यकीय सहायता कक्ष आणि स्पाईन फाऊंडेशनचा उपक्रम

najarkaid live by najarkaid live
September 23, 2024
in Uncategorized
0
मणक्याच्या (स्पाईन) आजाराच्या दुर्धर व महागड्या शस्त्रक्रीया मोफत
ADVERTISEMENT
Spread the love

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय सहायता कक्षाच्यावतीने आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून “डॉ. शेखर भोजराज” यांच्या “स्पाईन फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेच्या वतीने मणक्याच्या (स्पाईन) आजाराच्या दुर्धर व महागड्या शस्त्रक्रीया मोफत करण्यात येणार

*- आजाराबाबत संशोधन व आरोग्य अधिकारी /कर्मचारी यांच्या प्रशिक्षणातही फाऊंडेशन घेणार पुढाकार*

मुंबई दि.23 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दि.17 सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि.17 सप्टेंबर, 2024 ते दि.17 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महिना” राबविण्यात येत आहे.
या उपक्रमा अंतर्गत राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यास सुरुवात झाली असून त्यामाध्यमातून नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. झोपडपट्ट्यांमध्ये, वाड्यावस्त्यांवर 25 हजारांहून अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सुमारे 40 लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचे ध्येय निर्धारीत केले आहे. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2024 दरम्यान सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या वेळेत या शिबिरांचे आयोजन होत आहे.या सामुदायिक आरोग्य शिबिराचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे शासनाचे विविध विभाग, विविध NGOs व लोकसहभागातून ही शिबिरे आयोजित होत आहेत.
शिबिरांच्या तपासणी दरम्यान मणक्यांशी संबंधित आरांवर शस्त्रक्रीया करण्यासाठी स्पाईन फाऊंडेशन पुढे आले आहे. विविध जिल्ह्यात मणक्याशी संबंधित निदान झालेल्या रुग्णांवर त्या-त्या जिल्ह्यात जावून रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचे स्पाईन फाऊंडेशनचे विश्वस्त व मणक्यांच्या आजारावरील विशेषज्ञ डॉ शेखर भोजराज यांनी सांगितले आहे.
या शस्त्रक्रीयेंना प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये निदान झालेल्या 6 रुग्णांवर स्पाईन शस्त्रक्रीया डॉ.शेखर भोजराज यांचे मार्गदर्शनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. मणक्याच्या आजारावरील शस्त्रक्रीया या महागड्या असून त्याचा खर्च रु. 3 लक्ष ते रु.5 लक्ष ऐवढा असतो. हा खर्च सर्वसामान्य गोर-गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे त्यांना या शस्त्रक्रीया करता येत नाहीत. सामुदायिक आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या शस्त्रक्रीया मोफत होणार असल्याने गोर-गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.
स्पाईन फाऊंडेशनाच्या माध्यमातून शिबिराशी संबंधित आरोग्य कर्मचारी यांना फाऊंडेशनमार्फत प्रशिक्षणही देण्यात येणार असून मणक्यांच्या आजाराबाबत संशोधनही करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ शेखर भोजराज यांनी दिली. डॉ.भोजराज हे मुंबईतील मणक्याच्या आजारावरील विशेषज्ञ असून त्यांनी स्पाईनच्या दुर्मिळ अशा हजारो सर्जरी केल्या आहेत. त्यांनी जळगाव येथे आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिरांना भेटी दिल्या व तेथील उपस्थित रुग्ण व डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दि.17 सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि.17 सप्टेंबर, 2024 ते दि.17 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महिना” राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षामार्फत राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये सुमारे 1500 रुग्णालयांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निरामय सेवा फाऊंडेशन, धर्मादाय रुग्णालये, धर्मादाय संस्था, मेडीकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व लोक सहभागातून हे आरोग्य शिबिरे पार पडणार आहेत. उप मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री.रामेश्वर नाईक हे सामुदायिक आरोग्य शिबिराचे मुख्य समन्वयक आहेत.
दलित वस्त्या, जनजाती क्षेत्र, झोपडपट्ट्यांमध्ये, वाड्यावस्त्यांवर 25 हजारांहून अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सुमारे 40 लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचे ध्येय निर्धारीत केले आहे. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2024 दरम्यान दरम्यान सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या वेळेत या शिबिरांचे आयोजन होणार असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री, श्री.देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
शिबिरांमध्ये रुग्ण तपासणीसोबतच 59 प्रकारच्या रक्त चाचण्या, ई.सी.जी. या सारख्या तपासण्याही केल्या जाणार असून आवश्यक औषधांचे वाटप केले जाणार आहे. त्यासोबतच आयुष्मान भारत योजना- आभा कार्डचे वाटप केले जाणार आहे.
रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनांच्या माध्यमातून उपचार केले जातील. यासाठी उप मुख्यमंत्री कार्यालयांतर्गत ‘राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष समन्वय साधणार आहे.
**************

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी

Next Post

गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक : आ. राजूमामा भोळे

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक : आ. राजूमामा भोळे

गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक : आ. राजूमामा भोळे

ताज्या बातम्या

Recruitment

IBPS PO MT Recruitment 2025: 5208 बँकिंग पदांसाठी मेगा भरती सुरू – ऑनलाइन अर्ज करा!

July 2, 2025

IIPS मुंबई भरती २०२५: Senior Research Officer पदासाठी थेट मुलाखत – ७ जुलैला संधी

July 2, 2025
How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
“Jio-recharge-plans-2025

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us