मनोज जरांगे पाटील १६ सप्टेंबरपासून (maratha aarakshan) मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. (OBC) ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी असून मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेंच्या मागणी विषयी मोठं वक्तव्य केलं आहे.त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्याकडे सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन
Maratha aarakshan मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांच्या मागण्यानबाबत मंत्री गिरीश महाजन म्हणाले की,नियमात आहे तसेच सरकार करणार. नियमबाह्य आहे ते आम्ही काही करणार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्यात आहेत त्या कोर्ट देखील मान्य करणार नाही.’, असे गिरीश महाजन म्हणाले.आमची प्रामाणिक भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजालातील मुला मुलींना त्याचा फायदा झाला पाहिजे. जे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकायला पाहिजे. ते कोर्टात टिकायला पाहिजे ना. आम्ही निर्णय केला आणि कोर्टाने तो फेकून दिला मग करणार काय?, असे देखील महाजन यांनी सांगितले.
जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी जीवघेणा प्रवास सुरू केला आहे. आमचा अंत पाहू नका, अजूनही वेळ गेलेली नाही. आरक्षण द्या, नाहीतर तुमचे बारा-तेरा वाजवल्याशिवाय राहणार नाही असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.