ठाणे – आज २५-ठाणे लोकसभा मतदार संघातील इंडिया-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन विचारे ह्यांच्या प्रचारार्थ इंडिया-महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा पार पडली.ठाणे येथील राम गणेश गडकरी चौकात पर पडलेल्या ह्या सभेत हुकूमशाहीला आणि गद्दारांना गाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले.
ह्या सभेत केंद्रसरकारवर कडाडून टीका करताना; ‘मोदीजी, भाषण करताना महागाईचा ‘म’ तरी काढतात का?’हा थेट सवाल पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी केला.
उद्याचा दिवस नक्कीच आमचा आहे. विजय सत्याचाच होणार. हा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
सभेस राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, थोर समाजसेवक महात्मा गांधीजी ह्यांचे पणतू, लेखक तुषार गांधी, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, माजी आमदार मुझफ्फर हुसैन,शिवा संघटनेचे अध्यक्ष, प्राध्यापक मनोहर धोंडे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, स्टार प्रचारक किरण माने तसेच इंडिया – महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.