जळगाव,(प्रतिनिधी)- ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून जळगाव लोकसभेतून प्रफुल्ल रायचंद लोढा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
जळगाव लोकसभेतून याआधी भाजपाकडून स्मिताताई वाघ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करणदादा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली असून आता वंचित बहुजन आघाडी कडून राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल लोढा यांना तिकीट देण्यात आले आहे.