मुंबई – वंचित बहुजन आघाडीच्या परिवर्तन लढ्यासाठी नागाबाई लोखंडे या ज्येष्ठ माऊलीने आपल्या पेन्शनमधील पैसे साठवून एक लाख रुपये आज ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आंबेडकर भवन, दादर मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीसाठी निवडणूक निधी सुपूर्द केला. नागाबाई लोखंडे यांनी त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधून पैसे जमवून आपला सिंहाचा वाटा उचलला.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभर महासभा होत आहेत. या सभांना लाखोंच्या संख्येने जनसमुदाय स्वतःच्या पैशाने आणि स्वतःची भाजी भाकरी घेवून येतो. कुणासाठी गाडी पाठवली जात नाही, ना कुणाला पैसे देवून आम्ही गर्दी जमवत नाही. स्वाभिमानी जनता तन मन आणि धन देवून बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सत्ता परिवर्तनाचा लढा बळकट करण्याची धमक फक्त आणि फक्त अशा दिलदार आणि स्वाभिमानी जनतेमध्ये आहे.
बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगण्याचा अधिकार दिला आहे. आता आम्ही कुणाचे गुलाम म्हणून मेंढरासारखे जाणार नाही, तर या निवडणुकीत आम्ही सत्ता परिवर्तन घडवणारच हा विश्वास या माऊलीने या स्वतःच्या कमाईतील खारीचा वाटा बाळासाहेबांना देवून दाखवला आहे.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या माऊलीसारख्या हजारो माऊलींना सलाम..!