नवी दिल्ली : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामललावरील असीम भक्ती म्हणून दानसुध्दा केलं जात आहे. असचं दान हैदराबाद येथील एका व्यक्ती दिले आहे. ६४ वर्षीय चिल्ला श्रीनिवास शास्त्री यांनी ८ किलो सोने-चांदींपासून बनविलेली पादुका अनवाणी पायांनी चालत थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेट देणार आहेत.
दरम्यान, रामलला अद्वितीय असून त्यांचे भक्त देखील अद्वितीय आहेत. ही सोने-चांदीची पादुका देवाच्या कृपेने हैदराबादहून थेट अयोध्येला घेऊन जात आहेत. हा प्रवास करत दि. १६ जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांना सोन्याने मढलेली चरण पादुका सुपूर्द करतील. तर श्रीनिवास शास्त्री म्हणतात की ते त्याच मार्गाने अयोध्येला येत आहेत ज्या मार्गाने भगवान श्रीराम रामेश्वरमहून अयोध्येला पोहोचले होते. शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार ते ज्या मार्गांनी येत आहेत त्याचा नकाशा डॉ. राम अवतार यांनी खूप संशोधन करून तयार केला आहे.