म्होरक्याच्या मार्ग आंधळेपणानं जाणं कधी, कधी जीवावरही बेतू शकतं. मेंढ्यांच्या कळपाबाबतही असंच काहीसं घडले. त्या मार्गाने जाणं त्यांना एवढं महाग पडलं, की रात्रीच्या अंधारात शेणखताच्या खड्ड्यात पडून बाहेर पडण्याच्या धडपडीत झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल ८० मेंढ्या जीवाला मुकल्या. ही घटना सोमवारी रात्री गिरोलीपासून एक किलोमीटर अंतरावर घडली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार गिरोली येथील प्रभाकर रामजी थूल यांच्या शेतात ७०० शेळ्या-मेंढ्यांचा कळप मुक्कामी होता. रात्री परतताना पहिल्यांदा म्होरकं मेंढरु खड्यात पडलं. त्यानंतर एकामागं एक शेळ्या- मेंढ्या खोल खड्यात कोसळल्या. बाहेर पडण्याच्या केविलवाण्या धडपडीत त्यांच्यातच चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल ८० शेळ्या- मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. मेंढपाळ शामराव घोलबा कारंडे (रा. पिंपळखुटी, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) यांचे सुमारे १५ लाखाचे नुकसान झाले आहे