जळगाव – समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या उद्देशाने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय तर दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
माहे डिसेंबर 2019 चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, 16 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. तरी संबंधित समस्याग्रस्त व पीडीत महिलांना त्यांच्यासाठी आयोजित लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव विजयसिंग परदेशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.