मुंबई- काँग्रेस नेते राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यातच राज्यात विरोधी पक्षांने शिवसेनेवरही निशाना साधला. झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली, अशी बोचरी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे आता राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे भाजपकडून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या विधानामुळे आता शिवसेनेवरही टीका होऊ लागली आहे. “नाही धार “सच्चाई”कारांच्या शब्दांना आज दिसली “रोखठोक”लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली? छे..छे..झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!” असे ट्वीट आशिष शेलारांनी केले.