Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाळासाहेब आंबेडकरांवर घाणेरडे आरोप केले तर गाठ आमच्याशी ; काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना वंचितचे थेट आव्हान

najarkaid live by najarkaid live
December 21, 2023
in राजकारण
0
बाळासाहेब आंबेडकरांवर घाणेरडे आरोप केले तर गाठ आमच्याशी ; काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना वंचितचे थेट आव्हान
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई – काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत सहभाग का होत नाही? याबाबत उलटसुलट विधाने केली आहेत. वंचित बहुजन आघाडीवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्याला मी राजकिय भडवेगीरी म्हणतो. ती राजकीय भडवेगीरी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. असा घणाघाती पलटवार वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केला.

आज त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, वंचित बहुजनांचा मोठा समूह घेऊन व्यवस्थेने नाकारलेल्या, सत्तेच्या बाहेर फेकलेल्यांचा एकत्रित पक्ष उभा करून बाळासाहेब आंबेडकर त्यांना राजकारणात आणतात आणि सत्तेकडे कूच करतात. समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासारख्या बलाढ्य शक्ती आहेत त्यांना न घाबरता हिंमतीने, ताकदीने, थेट अचूकपणे आणि परखडपणे त्यांच्यावर टीका कोण करत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर हे आहेत.

इंडिया आघाडीची मोट बांधली गेली आहे. भाजपच्याविरोधात लढण्यासाठी त्यात आम्ही सहभागी होऊ इच्छितो. सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला रोखलं पाहिजे ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने घेतली. सातत्याने वेगवेगळ्या माध्यमांतून आम्ही ती भूमिका काँग्रेसपर्यंत पोहचवली. सभा, मीडिया आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका पोहचवली. यावर महाराष्ट्रातील नेत्यांनी ज्या काही कोलांट्या उड्या मारल्या त्या सगळ्या आपण बघितल्या आहेत.

ज्या पक्षाने २०१९ मध्ये आपली ताकद दाखवली आहे. २०१९ नंतर ज्या पक्षाची ४४ लाख मतांची संख्या आज कैकपटीने आपल्याला वाढलेली दिसत आहे. ज्या पक्षाची आज गावपातळीवर वॉर्डपर्यंत पक्ष बांधणी आहे. आणि ज्या पक्षाची कसलीही राजकीय हवा नसताना, भावनिक लाट नसताना, निवडणुकी नसताना लाखांच्या सभा होत आहेत. एकही रुपया न देता लाखों लोक सभेला येत आहेत. तर अशा बलशाली पक्षाला इंडिया आघाडीत घेण्यापासून तुम्हाला कोण रोखत आहे? असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला आहे.पृथ्वीराज चव्हाण यांनी 2 वर्षांपूर्वी भाजपमध्ये जाण्यासाठी कॉल केला होता की नाही याचं उत्तर आधी द्यावे.

काँग्रेस पक्षाविरोधात बंड करणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नैतिकता आहे का?

काँग्रेस पक्षाविरोधात बंड करणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नैतिकता आहे का? असा थेट सवाल सिद्धार्थ मोकळे यांनी विचारला आहे. G-23 नावाचा काँग्रेस पक्षामधील एका गटाने काँग्रेस पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्या गटाचे पृथ्वीराज चव्हाण हे सदस्य होते आणि आपला स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आणि नसलेली पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी ते वंचित बहुजन आघाडीला बदनाम करत आहेत.

वंचित बहुजन आघाडीने २०१९ च्या निवडणुकीत तुम्ही ५ वेळा सलग हरलेल्या लोकसभेच्या १२ जागा आम्हाला द्या, आम्ही लोकसभेला तुमच्यासोबत येतो. बाकी जागांवर आम्ही तुम्हाला समर्थन देतो अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकर यांची होती. पण, काँगेसने वेळखाऊपणा केला. गोदी मीडिया जसा भाजपच्या गोदीत बसला आहे, तसा तो काँग्रेसच्या पण गोदीत बसला आहे. त्या मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवल्या.

बाळासाहेबांना भेटायला यायचं ४-५ जणांनी नाटक करायचं आणि बाहेर जाऊन माध्यमांना म्हणायचं की, बाळासाहेबांना आम्ही विनंती केली की, आमच्यासोबत या पण बाळासाहेब यायला तयार नाहीत. या सगळ्यांना बाळासाहेबांनी एकच प्रश्न केला होता की, तुम्हाला जागा वाटपाचा अधिकार आहे का? असेल तर आता आपण बसून जागावाटप ठरवू. त्यावेळी हे म्हणायचे आम्हाला हा अधिकार नाही आमच्या दिल्लीतील हायकमांडला हा अधिकार आहे. तेव्हा बाळासाहेब आंबेडकर त्यांना म्हणायचे तुम्हाला तो अधिकार नाही तर मी तुमच्याशी चर्चा काय करणार ? ठरवणार काय? ज्यांना अधिकार आहे त्यांना बोलवा आपण जागावाटप करू. पण यांनी एकाही दिल्लीतील अधिकार असलेल्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं नाही. का बोलावलं नाही? कारण यांना युती करायची नव्हती, केवळ वंचित बहुजन आघाडीला बदनाम करायचं होत, वंचितांच्या राजकारणाला बदनाम करायचं होत म्हणून त्यांनी हा डाव खेळला.

पृथ्वीराज चव्हाणसारखे नेते हे गरीब मराठा समाजांचे झाले नाहीत ते वंचित आणि बहुजनांचे काय होणार? यांना राजकीय गणितं करून यांना सत्ता स्वतःकडे ठेवायची आहे. स्वताच्या मराठा समाजातील तरुणांना हे नोकरी उपलब्ध करून देऊ सकले नाहीत. स्वताच्या शिक्षण संस्थेत, कारखान्यात इतर ठिकाणी गरिब मराठा समाजातील तरुणांना हे कामाला लावू शकले नाहीत. असा सरंजामशाही नेता आमच्यावर शिंतोडे उडवतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं देशासाठी योगदान हे जगाला माहित आहे. त्यांच्या विचारांचा आणि रक्ताचा वारसदार असलेल्या नेत्यावर बोलायची हिंमत कशी होती ? यापुढे याद राखा जर वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर घाणेरडे आरोप केले तर गाठ आमच्याशी आहे.

वंचित आघाडीने सातत्याने सकारात्मक पाऊले उचलली, संवाद केला. 25 नोव्हेंबर रोजी छ. शिवाजी महाराज पार्कवर झालेल्या सभेचे निमंत्रण आम्ही राहुल गांधींना पाठवलं याचा अर्थ सगळ्यांना कळाला. जेव्हा तुम्ही म्हणता की, दलित, मुस्लीम मतदार वंचित बहुजन आघाडीकडे नाहीये, तेव्हा त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, तुम्ही वंचितच्या लाखोंच्या सभा उघड्या डोळ्यांनी बघा.

सर्व देशाला माहीत आहे की, वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीचा भाग होण्यासाठी स्वतःहून सातत्याने प्रयत्न करत आहे. हे आम्ही 1 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षांना पत्र पाठवून कळवले आहे. त्या नंतरही सातत्याने आम्ही प्रयत्न करतोय.

इंडिया आघाडील निमंत्रक आहे का?

आमचा मित्र पक्ष शिवसेनेला सांगितले की, इंडिया आघाडीला आजापर्यत निमंत्रक नाहीये. तर अशा परिस्थितीत कुठल्या निमंत्रकाला पत्र लिहावे? ? त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणने खोटे बोलू नये. तुमचा खोटारडेपणा सबंध महाराष्ट्र बघतोय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा जैन हिल्स कृषि महोत्सव – रविशंकर चलवदे

Next Post

पतीने केला तरी बलात्कार हा बलात्कारच असतो… वैवाहिक बलात्कारावर हायकोर्ट काय म्हणाले वाचा !

Related Posts

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
Next Post
पतीने केला तरी बलात्कार हा बलात्कारच असतो… वैवाहिक बलात्कारावर हायकोर्ट काय म्हणाले वाचा !

पतीने केला तरी बलात्कार हा बलात्कारच असतो... वैवाहिक बलात्कारावर हायकोर्ट काय म्हणाले वाचा !

ताज्या बातम्या

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya – आजचे राशीभविष्य 27 जुलै 2025

July 27, 2025
Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

July 27, 2025
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us